शिरपूर- येथील आर. सी. पटेल पॉलीटेक्नीक येथे सुझलॉन प्रा. लि. कंपनीतर्फे पुल कॅम्पस इंटरव्हयुचे आयोजन करण्यात आले. यात विविध महाविदयालयाच्या इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स विभागातील एकुण २६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
यात आर.सी.पटेल पॉलीटेक्नीकचे सात विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
सुरुवातीस पॉलीटेक्नीकचे प्राचार्य नवीन हासवाणी यांच्या हस्ते कंपनीचे मानव संसाधन विभागाचे व्यवस्थापक सुनील निकुंभे, कंपनीचे साईट मॅनेजर नितीन लांडे, सुनील नवादकर, टेक्निकल एक्स्पर्ट ललित पाटील यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी सुनील निकुंभे यांनी विद्यार्थ्यांना कंपनी विषयक माहिती दिली.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भुपेशभाई पटेल, नगरसेवक तपनभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, उद्योगपती चिंतनभाई पटेल, प्राचार्य नवीन हासवाणी, सर्व विभागप्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.
या उपक्रमाचे संयोजन आर.सी.पटेल इंजिनीरिंगच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख मिल्केश जैन यांच्या सहकार्याने पॉलीटेक्नीकच्या ट्रेनींग व प्लेसमेंट विभागाचे समन्वयक प्रा. जयेश चौधरी, प्रा.नीलिमा पाटील यांनी केले असून त्यांना प्रा. अश्विनी चौधरी, प्रा. निखील बोरसे, प्रा.निलेश पाटील यांचे सहकार्य लाभले.
Tags
news