आर. सी. पटेल फार्मसी कॉलेजच्या 28 विद्यार्थ्यांची वैद्यकीय संकेतक म्हणून निवड



शिरपूर - येथील आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयात अंतिम वर्ष बी. फार्मसी व एम. फार्मसी च्या विद्यार्थ्यांसाठी “ऍडव्हॅन्टमेड मेडिकल कोडीग अहमदाबाद” या कंपनी तर्फे 'मेडिकल कोडर' (वैद्यकीय संकेतक) या पदासाठी कॅम्पस इंटरव्हू घेण्यात आले असून 28 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
कंपनी तर्फे हिरेन शाह, सुनील पटेल, कु. पूर्वी शाह, नकुल जोशी, तुषार रंजन ही टीम आली होती.
हिरेन शाह यांनी महाविद्यलयातील विद्यार्थ्यांना प्रथम ऍडव्हॅन्टमेड बद्दल माहिती दिली. हि एक आरोग्य योजना आणि व्यवस्थापन केअर संस्था आहे. 2005 साली स्थापन झाली. आज अनेक राष्ट्रीय आरोग्य योजना, ब्लूज संस्था, को-ऑप्स आणि एसीओ या संस्थेवर विसंबून आहेत. ह्या कंपनीत सध्या 1800 हून अधिक कर्मचारी कार्यरत असून दरवर्षी 2 दशलक्ष पेक्षा जास्त वैद्यकीय नोंदींची प्रक्रिया करतात.
कंपनीच्या मानव संसाधन विभागा मार्फत हिरेन शाह व नकुल जोशी यांनी मेडिकल कोडींग म्हणजे काय आणि त्याचे जॉब प्रोफाइल कसे असेल या सर्व गोष्टी सविस्तर सांगितल्या. तसेच भविष्यातील वाटचालीबद्दल माहिती दिली. वैद्यकीय संकेतक डॉक्टरांकडून वैद्यकीय अहवाल घेतात, ज्यांमध्ये रोगीची स्थिती, डॉक्टरांचा निदान, डॉक्टरांच्या लिखित स्वरूपाचा संदेश यांचे जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय संकेतांमध्ये बदलून देण्याचे काम करतात. थोडक्यात मेडिकल कोडींग हे आरोग्य विमा साठी लागणारी कागदपत्रांची पूर्तता व रोग्याची सविस्तर माहिती सांकेतिक भाषेत लिहून सादर करणे असून या कामाची परदेशात वाढती मागणी आहे.
फार्मसी च्या पदविका, पदवी, पदव्युत्तर अशा सर्व स्तरातील एकूण 235 विदयार्थ्यांनी इंटरव्हयू मध्ये भाग घेतला व लेखी परीक्षेत (ऑनलाइन परीक्षा) घेतली. यात 114 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
या नंतर टेक्निकल राऊंड व एच. आर. राऊंड पॅनल च्या प्रश्नांना उत्तरे देऊन या मध्ये अनास खाटीक, अरशद मन्सुरी, अश्विनी पंचोली, गौरव सूर्यवंशी, गौतम खुणे, हर्षा लावणी, जिगर भानुशाली, कुणाल कोतकर, मैत्रेयी चव्हाण, मयुरी पाटील, नेहा ठाकूर, प्रकाश धुले, राजश्री रोकडे, रितु महाले, रोहिणी पाटील, रूपल जैन, रुशिकेश जुमले, सदीश, पटवर्धन, सैफुद्दीन बोहारी, सौरभ जैन, श्रेया जयस्वाल, शुभम खैरे, शुभांगी भदाणे, स्नेहल सोनार, स्वप्निल पाटील, वर्षा पाटील, विरश्री पाटील, यतीन साळवे या 28 विदयार्थ्यांनी आपली नोकरी पक्की केली. या सर्वांना 1.8 ते 2.5 लाख पर्यंत सॅलरी पॅकेज दिले जाणार आहे.
इंटरव्हूमध्ये निवड झालेल्या विदयार्थ्यंना अहमदाबाद येथे एक महिना प्रशिक्षण दिले जाणार असून टिम  लिडर, एरिया मॅनेजर अशी पदोन्न्नत्ती होत परदेशात जाण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
मुलाखतीच्या आयोजनासाठी प्रशिक्षण आणि प्लेसमेंट प्रमुख डॉ. एच. एस. महाजन, प्लेसमेंट अधिकारी शितल महाले, सहकारी डॉ. कपिल अग्रवाल, प्रा. डॉ. मोनिका ओला, डॉ. पंकज जैन, डॉ. सुचिता महाले, डॉ. विनोद उगले, प्रा. विलास जगताप, रजिस्टार जितेश जाधव यांनी परिश्रम घेतले.
संस्थेचे अध्यक्ष अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, नगरसेवक तपनभाई पटेल, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील यांनी यशस्वी आयोजनाबद्दल कौतुक केले आणि यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने