औसा-प्रतिनिधी
26 जानेवारी 1950 रोजी या देशाचे संविधान स्विकारत असतानाच आपण सर्व धर्म, समभाव, पंथ, भाषा ,लिंग व rc प्रांतांच्या व्यक्तींनी एक समान कोणत्याही भेदभावाशिवाय भारतीय म्हणून स्विकारले आहे. असे असताना केवळ धर्माच्या आधारावर भेदभाव करून नागरीकत्व नाकारणे हा भारतीय राज्य घटनेशी द्रोह आहे. म्हणूनच नागरीकत्व सुधारणा कायदा (NRC / CAA तात्काळ रद्द करावा अशी मागणी भीम आर्मीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. या कायद्याच्या विरोधात आंदोलन उभे केले म्हणून भीम आर्मी संस्थापक अध्यक्ष अॅड चंद्रशेखर आझाद यांना केंद्र सरकारने खोट्या केसेस करून अटक देखिल केली आहे. आजही आपल्या देशातील 13 कोटी पेक्षा जास्त नागरीकांकडे कोणतेही रहिवासी प्रमाणपत्र/ रहिवासी दाखले नाहीत. स्वतः चा हक्काचा निवारा तर लांबच राहीला पण साधं कोणत्याही ग्रामपंचायती व नगर परिषदेच्या दप्तरी जन्माची अथवा मृत्यूची नोंदही नाही. रेशनकार्ड नाही, पोटापाण्यासाठी भटकण्याशिवाय पर्याय नाही. ते याच देशाचे नागरिक आहेत म्हणून कस सिद्ध करावे? उलट या उपेक्षित, वंचित घटकांच्या गरीबी विरूध्द चाललेल्या संघर्षाची जबाबदारीच सरकारची आहे .असे असताना तुम्ही नागरीकत्व सिद्ध करण्याची जबाबदारी आमच्यावर कशी टाकू शकता? धर्माच्या नावाने भेदभाव करणे अमानुष आहे आणी मानवतावादी दृष्टीकोनातून भीम आर्मी या कायद्याचा जाहीर निषेध करते असे ही उत्तरेश्वर कांबळे म्हणाले कायदा रद्द न झाल्यास राज्यभर आंदोलन छेडणार असल्याचे त्यांनी पत्रकात नमुद केले आहे.