शिरपुर (प्रतिनिधी) :- शिरपुर येथील विधिज्ञ अॅड. प्रविणसिंग जयसिंग पाटील यांना नुकत्याच इचलकरंजी येथे झालेल्या एका भव्य सोहळ्यात थोर समाजसेविका मा. सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते महाराष्ट्र लोककल्याण सेवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय विचार साहित्य संमेलन इचलकरंजी, कोल्हापूर २०२० आयोजित कार्यक्रमात राज्यातील कला, साहित्य, समाज, उदयोग, शिक्षण, युवक, सांस्कृतिक, अशा क्षेत्रातील कार्यात असामान्य वाटचाल करणार्याय व्यक्तींचा व संस्थांचा विलोभनीय सन्मान सोहळा दिनांक ०५ जानेवारी २०२० वार रविवार रोजी सकाळी ११.०० वा. श्रीमंत नारायणराव घोरपडे नाटयगृह, इचलकरंजी येथे पार पडला या सोहळ्यात अॅड. प्रविणसिंग पाटील यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मा. सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते मानचिन्ह, पदक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. यावेळी मा. मंत्री लक्ष्मणराव ढोबळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. सदाशिव काळे तर उदघाटक म्हणून उदयोजक श्री. सुधीर जाधव, प्रमुख पाहुणे म्हणून मा. आमदार राजु आवळे, प्रा. बी. एन. खरात, नगरसेवक अब्राहम आवळे आदींसह यावेळी राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
अॅड. प्रविणसिंग पाटील खान्देश कन्या स्व. स्मिता पाटील शैक्षणिक सेवा सोसायटी शिरपूर जि. धुळे या संस्थेचे स्वीकृत सदस्य असून संस्थेचे अध्यक्ष श्री सुभाषसिंह जमादार यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.