शिरपूर तालुक्यात माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांचे निर्विवाद वर्चस्व, तालुक्यातील सर्व 14 गट भाजपाकडे, पं.स. देखील भाजपाच्या ताब्यात




शिरपूर – महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री अमरिशभाई पटेल यांनी शिरपूर तालुक्यावर एकतर्फी निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले असून तालुक्यातील सर्व 14 जि.प. गटांवर भाजपाचे तर शिरपूर पंचायत समिती देखील भाजकाकडे राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व बाबतीत अमरिशभाई पटेल यांची जादू पुन्हा चालल्याचे निकालाने स्पष्ट केले आहे.

सर्व विजयी उमेदवारांनी जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला. जनक व्हीला या निवासस्थानी राज्याचेमाजी मंत्री अमरिशभाई पटेलभाजपाजिल्हाध्यक्ष बबनराव चौधरीउपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेलनगरसेवक तपनभाई पटेल, माजी नगराध्यक्ष प्रभाकररावचव्हाणभाजपा तालुका अध्यक्ष राहुल रंधे,शहराध्यक्ष हेमंत पाटील व मान्यवरांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.

शिरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद 14 गट व पंचायत समिती 28 जागांसाठी बिनविरोध व निवडून आलेल्या उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत.

कोडीद गट - अनुसूचित जमाती स्‍त्री, कु. अनिता रतन पावरा (भाजपा) बिनविरोध निवडून आल्या आहेत.

बोराडी गट - अनुसूचित जमाती स्त्री, जताबाई रमण पावरा (भाजपा) 7357 मते मिळवून 5780 मतांच्या फरकाने विजयी झाल्या. साधना रणजितसिंह पवार (काँग्रेस) 1577 मते, शितल अमित पावरा (राष्ट्रवादी काँग्रेस) 3132 मते.

पळासनेर गट - अनुसूचित जमाती स्त्री, मोगरा जयवंत पाडवी, बिनविरोध निवडून आल्या.

सांगवी गट - अनुसूचित जमाती, योगेश चैत्राम बादल (भाजपा) 5164 मते मिळवून 786 मतांच्या फरकाने विजयी झाले. तसेच कनिलाल हिरमल पावरा (राष्ट्रवादी) 4380 मते, रणजितसिंह भरतसिंह पावरा (काँग्रेस) 552, रामचंद्र थोटू पावरा (भारतीय कम्युनिस्ट पक्ष) 278, सुनिल धुळसिंग पावरा (अपक्ष) 224, सुभाष विजयसिंग सोनवणे (अपक्ष) 519 मते.

रोहिणी गट – कैलास हारसिंग पावरा (भाजपा) अनुसूचित जमाती गटातून बिनविरोध निवडून आले.

दहिवद गट - अनुसूचित जमाती स्‍त्री, आरती दिनेश पावरा (भाजपा) 7866 मते मिळवून 5712 मतांच्या फरकाने विजयी झाले. लिलाबाई विक्रम पावरा (शिवसेना) यांना 2154 मते मिळाली.

वाघाडी गट - अनुसूचित जमाती स्‍त्री, सखुबाई विजय पारधी (भाजपा) बिनविरोध निवडून आले.

विखरण बु. गट - सर्वसाधारण, तुषार विश्वासराव रंधे (भाजपा) हे 9774 मते मिळवून 7443 मतांच्या फरकाने तालुक्यात सर्वात जास्त मतांनी विजयी झाले. उदयराव शामराव पाटील (अपक्ष) 336, चंद्रकांत युवराज पवार (राष्ट्रवादी) 2331 मते.

तऱ्हाडी त.त. गट - अनुसूचित जमाती, भीमराव संतोष ईशी (भाजपा, कमळ) 7418 मते मिळवून 4939 मतांच्या फरकाने विजय प्राप्त केला. चैत्राम शिवराम ईशी (राष्ट्रवादी) 2479, ताईबाई धनसिंग भिल (अपक्ष) 579 मते.

वनावल गट - सर्वसाधारण स्त्री, अभिलाषा भरत पाटील (भाजपा) 7616 मते मिळवून 3809 मतांच्या फरकाने विजयी झाले. मनिषाबाई मिलींद पाटील (अपक्ष) 3807, मंगलकोरबाई भवान राजपूत (अपक्ष) 86 मते.

शिंगावे गट - सर्वसाधारण, जिल्हा परिषदेचे विद्यमान उपाध्यक्ष देवेंद्र जयराम पाटील (भाजपा) हे 5770 मते मिळवून फक्त 21 मतांनी विजयी झाले. शैलेश मनोहर पाटील (राष्ट्रवादी) 5749, प्रवीण चंद्रसिंग देशमुख (अपक्ष) 1605 मते.

थाळनेर गट - अनुसूचित जाती स्त्री, भैरवी प्रेमचंद शिरसाठ (भाजपा) 7479 मते मिळवून 3729 मतांनी विजयी झाले. छायाबाई सुनील शिरसाठ (शिवसेना) 3750 मते.

हिसाळे गट - अनुसूचित जमाती स्‍त्री, बेबीबाई कुटवाल पावरा (भाजपा) 5844 मते मिळवून 1041 मतांनी विजयी झाले. हिराबाई तात्या पवार (शिवसेना) 4803, हिराबाई विजय प्रतिहार (भारतीय कम्युनिस्ट पक्ष) 520 मते.

भाटपुरा गट – सर्वसाधारण – संजय संतोष पाटील (भाजपा) 9751 मते मिळवून 6991 मतांनी विजयी झाले. शामकांत रामराव करनकाळ (राष्ट्रवादी) 2760 मते, वामन त्रयंबक कोळी 304, गणेश वामन वाडीले 99 मते.

शिरपूर तालुक्यातील पंचायत समितीच्या 24 गण साठी उमेदवार पुढीलप्रमाणे.

फत्तेपूर फॉ. गण - अनुसूचित जमाती, सत्तारसिंग नारखा पावरा (भाजपा) 3411, विशाल नटराज पावरा (काँग्रेस) 2366 मते.

कोडीद गण - अनुसूचित जमाती स्‍त्री, सुशिलाबाई कांतीलाल पावरा (अपक्ष) 2807 मते मिळवून विजयी झाले. तर विजयलक्ष्मी हिरालाल पावरा (भाजपा) यांना 2389 मते मिळाली.

बोराडी गण - अनुसूचित जमाती स्‍त्री, सरिता विशाल पावरा (भाजपा) 4256 मते मिळवून विजयी, उषाबाई अनिल पावरा (राष्ट्रवादी) 1546.

न्यू बोराडी गण - अनुसूचित जमाती स्‍त्री, लिलाबाई नारसिंग पावरा (भाजपा) 2578 मते मिळवून विजयी. बायलीबाई शेतीराम पावरा (काँग्रेस) 620, बियारीबाई कुमारसिंग पावरा (अपक्ष) 1767, सुरेखा मनोहर पावरा (राष्ट्रवादी) 1089.

उमर्दा गण - अनुसूचित जमाती स्‍त्री, लताबाई वसंत पावरा (भाजपा) 3569 मते मिळवून विजयी. कमलबाई पंकज पावरा (राष्ट्रवादी) 1900.

पळासनेर गण - अनुसूचित जमाती मानसिंग केऱ्या भिलाडा (भाजपा) 3101 मते मिळवून विजयी. दत्तू गुलाब पाडवी (राष्ट्रवादी) 1545, गोटीराम नारु पावरा (काँग्रेस) 1060.

सांगवी - अनुसूचित जमाती स्त्री, प्रभाबाई अशोक कोकणी (भाजपा) 3189 मते मिळवून विजयी. प्रियंका अरविंद पावरा (काँग्रेस) 326, पार्वताबाई शिवदास भिल (राष्ट्रवादी) 2164.

खंबाळे - अनुसूचित जमाती स्‍त्री, कमलाबाई बालकिसन पावरा (भाजपा) 3188 मते मिळवून विजयी. रुखमाबाई बियानसिंग पावरा (राष्ट्रवादी) 1328, शकुंतलाबाई चंपालाल पावरा (काँग्रेस) 699.

आंबे गण – अनुसूचित जमाती – दिनेश गोपीचंद पावरा (अपक्ष भाजपा पुरस्कृत) 3298 मते मिळवून विजयी. गेंद्या कैलारस पावरा (राष्ट्रवादी) 1619 मते.

रोहिणी - अनुसूचित जमाती, बागल्या वना पावरा (अपक्ष, भाजपा पुरस्कृत) 2611 मते मिळवून विजयी. सुरमीबाई रमेश भिल (भाजपा) 1705, रामदास काशिराम कोळी (राष्ट्रवादी) 297.

दहिवद - अनुसूचित जमाती, आशाबाई विक्रम पवार (भाजपा) 3758 मते मिळवून विजयी. रंजनाबाई रामराव मोरे (शिवसेना) 810.

हाडाखेड - अनुसूचित जमाती स्‍त्री, छाया प्रल्‍हाद पावरा (भाजपा) 2493 मते मिळवून विजयी. उमाबाई समुद्रसिंग भावराव (शिवसेना) 1167, मुराबाई सरदार पावरा (काँग्रेस) 1688.

वाघाडी – रुपाबाई मनसाराम भिल (भाजपा) बिनविरोध विजयी.

वाडी – बबन भिल (भाजपा) बिनविरोध विजयी.

अर्थे खु. - ना. मा. प्र., शशिकांत माधवराव पाटील (भाजपा) 5521 मते मिळवून विजयी. सुधीर दिलीप पाटील (राष्ट्रवादी) 1480, उदयराव शामराव पाटील (अपक्ष) 159.

विखरण बु. - नामाप्र स्त्री, विनीताबाई मोहन पाटील (भाजपा) 3238 मते मिळवून विजयी. अनिता किशोर पाटील (राष्ट्रवादी) 1901.

जळोद - अनुसूचित जमाती, राहुल राजेश पावरा (भाजपा) 3814 मते मिळवून विजयी. नाना श्रावण भिल (राष्ट्रवादी) 1001.

तऱ्हाडी त.त. - नामाप्र स्त्री, प्रतिभा कैलास भामरे (भाजपा) 3462 मते मिळवून विजयी. विजया प्रुफुल्ल पाटील (राष्ट्रवादी) 1997.

वनावल - नामाप्र स्त्री, ममता ईश्वर चौधरी (भाजपा) 4061 मते मिळवून विजयी. स्नेहा छोटू चौधरी (शिवसेना) 2029.

जातोडा - नामाप्र, निलेश विश्वासराव पाटील (भाजपा) 3747 मते मिळवून विजयी. नागराज महादू पाटील (राष्ट्रवादी) 1405.

शिंगावे - नामाप्र, रामकृष्ण विठोबा महाजन (राष्ट्रवादी) 3656 मते मिळवून विजयी. चंद्रकांत दामोदर पाटील (भाजपा) 2529 मते.

करवंद - नामाप्र स्त्री, वैशाली सुनिल सोनवणे (भाजपा) 4228 मते मिळवून विजयी. किर्तीबाई जितेंद्र पाटील (राष्ट्रवादी) 2492.

थाळनेर - सर्वसाधारण, विजय संतोष बागुल (भाजपा) 3187 मते मिळवून विजयी. गणेश आधार चौधरी (शिवसेना) 2273.

अहिल्यापूर - अनुसूचित जाती, विजय शिवदास खैरनार (भाजपा) 3391 मते मिळवून विजयी. आशिषकुमार ईश्वर अहिरे (राष्ट्रवादी) 2213, विजय भिमराव ढिवरे (काँग्रेस) 82, देविदास बारकू निकुंभे (अपक्ष) 46.

अजनाड - नामाप्र, दर्यावसिंग भिमसिंग जाधव (भाजपा) 2554 मते मिळवून विजयी. योगेश भाईदास जाधव (शिवसेना) 2284, उदयराव शामराव पाटील (अपक्ष) 65, संजय वेडू पाटील (अपक्ष) 358, संतोष देवराम पाटील (भारतीय कम्युनिस्ट पक्ष) 123.

हिसाळे - अनुसूचित जमाती, बाळू बुधा भिल (भाजपा) 3015 मते मिळवून विजयी. रवींद्र इंद्रसिंग वळवी (शिवसेना) 2034, कवरलाल रघुनाथ कोळी (कम्युनिस्ट) 547.

होळ - सर्वसाधारण स्त्री, लताबाई जितेंद्र राजपूत (भाजपा) 3264 मते मिळवून विजयी. देवकाबाई राजेंद्रसिंह राजपूत (राष्ट्रवादी) 1508, जुबेदाबी शबीर मौले (काँग्रेस) 1282.

भाटपुरा - सर्वसाधारण स्त्री, धनश्री योगेश बोरसे (भाजपा) 4837 मते मिळवून विजयी. नूतन सुरेश सोनवणे (अपक्ष) 1904.

निवडणूक निर्णय अधिकारी श्री चिंचकर, तहसीलदार आबा महाजन, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अमोल बागुल, अधिकारी व कर्मचारी यांनी निवडणुकीसाठी प्रयत्न केले.



Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने