मंत्री के.सी.पाडवी यांना राजकीय धक्का,पत्नीचा पराभव



नंदुरबार:प्रतिनिधी:कॅबिनेट मंत्री के सी पाडवी यांना मोठा धक्का बसला आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत काँग्रेसच्या उमेदवार असलेल्या के सी पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी यांचा पराभव झाला आहे.

राज्यात महाविकासआघाडीचे सरकार असले तरी नंदुरबार जिल्हा परिषदेत महाविकासआघाडी नव्हती. काँग्रेस – शिवसेना या जि. प तून स्वबळावर लढले होते. या निवडणूकीत शिवसेनेकडून काँग्रेसचा पराभव करण्यात आला. के सी पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी यांचा तोरणमाळ गटात शिवसेनेचे धडगाव तालुकाप्रमुख गणेश पराडके यांनी हेमलता पाडवींना पराभूत केलं.

नंदुरबार जिल्ह्याची काँग्रेसची धुरा के सी पाडवी यांच्याकडे सोपावली होती. त्यांनी जि प च्या निवडणूकीत त्यांच्याच पत्नीला रिंगणात उतरवले होते , त्यामुळे यांच्यासाठी ही लढत प्रतिष्ठेची झाली होती. 

महाविकासआघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे आदिवासी विकास मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. मागील आठवड्यातच त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.

परंतु जिल्हा परिषदेत पत्नीचा पराभव झाल्याने के सी पाडवींना नंदुरबारमध्ये हा मोठा धक्का मानला जात आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने