शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर शहरात आणि तालुक्यात घराबाहेर असलेल्या मोटरसायकल रात्रीच्या वेळेस चोरीस जाण्याच्या घटना या नवीन नाहीत. यापूर्वी नागरिकांच्या शेकडो मोटारसायकली चोरीस गेलेल्या आहेत. त्यापैकी काहींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले असले तरी चोरीस गेलेल्या मोटर सायकल व शोध लागलेला मोटरसायकल त्यांची संख्या फार मोठी आहे. अशातच शहरात अधून मधून रात्री पहाटेच्या वेळेस मोटरसायकल चोरीचे सत्र सुरूच असते. यावर नियंत्रण मिळवण्यात पोलीस विभागाला यश मिळालेले नाही. म्हणून चोरटे थोडा कालावधी उलटला की मोटरसायकल चोरी करून पोलिसांसमोर आव्हान निर्माण करत असतात त्यामुळे वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले असते.
काल शिरपूर तालुक्यातील अमोदे शिवारातील रामदेवजी बाबा नगर येथे मध्यरात्री एका बंगल्याच्या दरवाजा कापत असल्याचा आवाज झाल्याने युवराज माळी ते जागे झाले. युवराज माळी यांनी बाहेर येऊन आरडाओरड केली तेव्हा दगडफेक करत फरार होण्याचा प्रयत्न केला मात्र रात्रीच्या अंधारात पडत असताना त्यांना रस्त्यातील खड्डे दिसला नाही आणि दोन चोर खड्ड्यात जाऊन पडले त्यातून एकाने तेथून पळ काढला व त्याचे इतर साथीदार देखील पसार झाले मात्र एक चोर खड्यात अडकल्याने नागरिकांच्या हाती लागला. आरडाओरड झाल्यामुळे कॉलनीतील रहिवासी जागी झाले आणि त्यांनी चोरास ताब्यात घेतले पोलिसांना सुचित करण्यात आले. या वेळी पोलिसांना घेऊन या चोरास अटक केली. यावेळी या परिसरात आलेले तीन ते चार चोरटे पिकअप व्हॅन घेऊन आलेले होते. मोटारसायकलींचा लॉक तोडायचे आणि त्यांना व्हॅनमध्ये ठेवून पसार व्हायचे हा त्यांचा प्लान होता मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्यांच्या प्लॅन फसला अनेक चोर रंगेहात पकडला गेला. यावेळी हे मोटर सायकल चोरीच्या प्रयत्नात होते. यापूर्वी देखील या ठिकाणाहून युवराज माळी यांची मोटारसायकल चोरी गेली आहे अद्याप तिच्या कोणताही ठावठिकाणा लागलेला नसताना परत त्यांच्या घरी जाऊन मोटारसायकल चोरी करण्याच्या चोरट्यांच्या प्रयत्न होता. ताब्यात घेतलेला आरोपी मध्य प्रदेशातील असून त्याने त्याचे नाव केंदृ डोंगर सिंग बामण्या राहणार बेवड्या जिल्हा धार असे सांगितले आहे शिवाय त्यांनी आपल्या साथीदारांच्या नावाची देखील कबुली दिली आहे. तक्रारदार यांच्या तक्रारीवरून शिरपूर पोलिस स्टेशनला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किमान आता तरी पोलिसांनाही या चोराच्या आधारे तपास करून मध्यप्रदेशातील चोरट्यांचे शिरपूर कनेक्शन उघड करावे व या घटनांवर पूर्णविराम लावा अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
Tags
news