कल्पेश राजपूत, शहादा
नंदुरबार- जिल्हा परिषद निवडणुकीत त्रिशंकु परिस्थित असल्याने सत्तास्थापनेसाठी अखेर काँग्रेस व शिवसेनाची आघाडी. त्यात काँग्रेसच्या २३ जागा तर शिवसेनेच्या ७ असे एकूण सत्ता स्थापनेसाठी ३० जागा पूर्ण खरे तर नंदुरबार जिल्हा परिषद दोघांच्या २३-२३ जागा होत्या त्यात दोघांची "टाय" झाली होती. त्यामुळे शिवसेनेशिवाय सत्ता स्थापन करणे शक्य नव्हते काँग्रेस व शिवसेना जिल्हापरिषदेसाठी एकत्र येऊन अध्यक्ष पदी सीमा पद्माकर वळवी काँग्रेस पक्षाचे उमेदवार तर उपाध्यक्ष पदी राम रघुवंशी शिवसेनेचे उमेदवार, त्यात काँग्रेस- शिवसेना आघाडीकडे आता ३० सदस्यांचे संख्याबळ असून भाजप- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युवतीकडे २६ सदस्यांचे संख्याबळ होते.

