जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी तुषार विश्वासराव रंधे व उपाध्यक्ष पदासाठी सौ. कुसुमताई कामराज निकम यांची बिनविरोध निवड

धुळे - येथील श्री विले पार्ले केळवणी मंडळ कॅम्पस मध्ये धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक बाबत शुक्रवारी दि. 17 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता बैठक घेण्यात आली.या बैठकीला धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी तुषार विश्वासराव रंधे व उपाध्यक्ष पदासाठी सौ. कुसुमताई कामराज निकम यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली.यावेळी भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर, खा. सुभाष भामरे, माजी मंत्री अमरिशभाई पटेल, माजी मंत्री आमदार जयकुमार रावल, आमदार काशिराम पावरा, भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी जिल्हा परिषद सभापती शिवाजीराव दहिते, शिवाजी दहिते बापू, कामराज निकम, प्रभाकरराव चव्हाण, संजय शर्मा,अनिकेतपाटीलकिशोर सिंघवी व जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धुळे एस. व्ही. के. एम. कॅम्पस मध्ये सत्कार करण्यात आला.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने