विविध बहुजन संघटनांचा शहाद्यात एल्गार



प्रतिनिधी शहादा 

 सीएए आणि एनआरसी विरोधात बहुजन संघटनांचा मोर्चा  आयोजित करण्यात आला .बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक प्रा. विलास खरात (दिल्ली )यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा   दुपारी २ वाजता एस ए मिशन जवळील चौकातून या मोर्चाला सुरुवात होऊन  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास  अभिवादन मान्यवरांनी  केल्यानंतर वनविभागाच्या कार्यालयासमोर सभेत रूपांतर झाले  आहे  .   या सभेला एससी,एसटी,एनटी, ओबीसी भटक्या विमुक्त जाती आणि अल्पसंख्यांक समाज संघटनांनी हजारोंच्या  संख्येने उपस्थित राहुन केंद्र सरकारचे निषेध करुन घोषणांनी शहर दणाणून काढले  .   मोर्चेचे सभेत रूपांतर झाले.  यावेळी व्यासपीठावर वरुन दिल्ली चे बहुजन मुक्तीमोर्चाचे प्रा विलास खरात म्हणाले की  केंद्र शासनाने सीए आणि एनआरसी या संदर्भातील केलेला कायदा असलेले धोरण हे केवळ मुस्लिमच नव्हे तर या देशातील गावकुसाबाहेर राहणाऱ्या ४०% हिंदू समाजातील शोषित ,पीडित, वंचित मूलनिवासी जनतेच्या अस्तित्वावरच घाला घालणारे आहे.यामुळे पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या अनेकांना डीटेंशन कॅम्पमध्ये राहण्याची वेळ येणार असून दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाणार आहे. असे साांगुन तेपुढे म्हणालेे की ,कायद्याला विरोध करणारे देशद्रोही आणि कायद्याचे समर्थन करणारे देशभक्त अशी विभागणी करणाऱ्यांना  देखील या मोर्चाच्याद्वारे उत्तर दिले  आहे .सी ए ए कायदा हा घटनेच्या धर्मनिरपेक्षता या तत्वाला हरताळ फासणारा असून यामुळे जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा ही धार्मिक बाबीवर भेदभाव करणारा देश अशी होऊ लागली आहे. याशिवाय पुन्हा धार्मिक आधारावर या देशाचे होऊ पाहणारे विभाजन रोखण्यासाठी असलेली भूमिकादेखील या मोर्चात स्पष्ट केली . सी ए ए हा कायदा केंद्र सरकार जबरदस्तीने लादू पाहत आहे 
 कोणताही कायदा हा संविधानाच्या मूळ कायद्याला मोडून केला जाऊ शकत नाही. त्यामुळे भारतीय घटनेच्या कलम १४ अन्वये कोणत्याही प्रकारच्या भेदावर नागरिकत्व नाकारणे ही बाब संविधानाच्या मूलभूत तत्वाचा भंग असल्याची भूमिका आणि त्यामुळेच हा असंवैधानिक कायदा रद्द करावा .
 .एस ए मिशन बंगला चौक खेतिया मुख्य रस्ता महात्मा गांधी पुतळा यामार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अभिवादन केल्यानंतर मोर्चा हा वनविभागाकडे वळविण्या आल. तेथे प्रातिनिधिक स्वरूपात मोर्चेकर्यांनी  आपली भूमिका मांडली.दरम्यान शिष्टमंडळाने  मोर्चा संदर्भातील निवेदन तहसीलदारांना देऊन आपली भूमिका स्पष्ट केली. 
या मोर्चाला बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, राष्ट्रीय ख्रिचन मोर्चा, इंडियन लॉयर्स असोसिएशन, इंडियन मेडिकल प्रोफेशनल असोसिएशन,प्रोटॉन,भारतीय विद्यार्थी मोर्चा , राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद ,राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ,बहुजन क्रांती मोर्चा,भारत मुक्ती मोर्चा , छत्रपती क्रांती मोर्चा, इब्टा शिक्षक संघटना, कास्ट्राईब शिक्षक संघटना राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा जमियत ए उलमा  ए हिंद, राजमाता रमाई महिला मंच आदी अनेक संघटनांचा पाठिंबा दिला .
या पुढे प्रा विलास खरात दिल्ली  म्हणाले की,  यहुदी चे रक्त आणि ब्राम्हणाचे रक्त एकच आहे . मोदी ओबीसी आहे तर ओबीसी जनगणना का करत नाही. या देशात जे सीऎ एन आर सी कायदे बनविले हे संविधान विरॊधी आहे .३% टक्के लोकं सरकार चालवीत आहे . हिंदु चा अर्थ आहे ब्राम्हणांचा गुलाम. ब्राम्हण  लोकं हे हिदुंना गुलाम बनविण्याचा प्रयत्न करत आहे . या देशात १५ करोड हिंदुना फटका बसणार आहे . एन आर सी लागू करायची असेल तर डिएने च्या आधारावर केला पाहिजे.  ज्याचा डी एन अे भारताच्या नसेल त्याला या देशातून हद्दपार केले पाहिजे. ईव्हीएम मध्ये घोटाळा करुन हे सरकार सत्तेवर आले.आज देशात काळे कायदे करत आहे .या सरकारचे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही.
  बामसेफ च्या जिल्हाध्यक्षा सुमित्रा वसावे म्हणाल्या की , जो पर्यंत कायदा रद्द होत नाही तो पर्यंत मोर्चे निघत राहतील.  १९५१ पुर्वी च्या रहिवासी कागद पत्र ज्याच्याकडे आहे त्यालाच नागरित्व मिळणार आहे .अतिदुर्गम भागातील आदिवासीं बाधंवांकडे रहिवासी असल्याचा पुरावा  मिळणार नाही. ४०% हिंदू - मुस्लिमांना या धोका होणार आहे .  अॅड निकम म्हणाले की, कायद्याबाबत भारताचे नागरिक किती जागृत आहे हे मोर्च्याच्या माध्यमातून देश भरातुन निघालेल्या मोर्च्याच्यातुन दिसून येत आहे ,कलम १४ अन्वेय सर्व समाजातील लोकांना समान जीवन जगण्याचा अधिकार आहे . CAA. वNCR हा कायदा असंविधानिक आहे .
 मॊलाना फजुला म्हणाले, लाखोच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरत आहे मात्र शासन याकडे दुर्लक्ष करताहेत, मिडियाची भूमिका संशयास्प असुन जे तथ्य आहे ते लोकांच्या समोर आणत नाही. संविधानिक तथ्ये दूषित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.आज किती हि काळे कायदे करा. एक दिवस असा येईल, तो दिवस फक्त आमचाच राहिल. 
 ओबीसी संघटनचे दिलीप पाटील म्हणाले की,आझादी लढाई आम्ही बघितली नाही. पण ही  लढाई सुरू झाली आहे . ८५% बहुजन समाज या देशात आहे आणि राज या देशावर १५% करित आहे ही बाब दुर्लक्षित करणारी आहे.प्रास्ताविक भरती विद्यार्थी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राहुल शिंदे यांनी केलेसुत्रसंचलन प्रा विष्णू जोंधळे यांनीतर आभार प्रदर्शन राजू शेख व अनिल भामरे यांनी केले.  हजारो च्या संख्येने नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते पोलिस बंदोबस्त चोक ठेवण्यात आला होता 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने