बोराडी - येथील मातोश्री बनुमाय कन्या विद्यालयात पल्स पोलिओ मोहीम निमित्ताने जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळाप्रमुख कल्पना पाटील होत्या. विद्यालयातील उपशिक्षक गणेश भामरे यांनी पोलीओ होण्याची कारणे, घ्यावयाची काळजी व पोलिओ टाळण्यासाठी डोस बाबत माहिती सांगुन आपल्या घरातील किंवा शेजारी पाच वर्षांआतील बाळांना पोलिओ डोस देण्यासाठी बुथवर नेण्याचे आवाहन केले.यावेळी बोराडीतील पोपटनगर,संतगाडगेनगरमध्ये विद्यार्थीनींनी रॅली काढुन पोलिओ डोस घेण्याबाबत घरोघरी जागृती करण्यात आली.याप्रसंगी पर्यवेक्षक एन.एम.सोनवणे,पी.आर.चव्हाण,जे. पी.पावरा,बी.एन.ठाकरे,वैशाली पवार,टी.टी.ढोले,डी.जे.चव्हाण, पंकज चव्हाण,एस.ए.अहिरे,सी.एस.बडगु जर,निरज निकम,राजेंद्र गिरासे,मधुकर सोनवणे,भिमराव धनगर,सचिन पवार इ.उपस्थित होते.सुत्रसंचालन वैशाली यांनी केले.
Tags
news
