शिरपुरात मोटार सायकल नंतर कार चोरी , पोलिसाना आव्हान

शिरपूर - शिरपूर येथून मोटारसायकल घरफोडी नंतर आता चक्क चार चाकी इर्टिका चोरी गेल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.कधी भरदुपारी घरफोडी तर कधी मोटरसायकल चोरीचे प्रमाणात वाढ होत आहे.या चोरींमध्ये काही कमी होती की काय म्हणून चक्क चार चाकी इर्टिका गाडीच चोरून नेल्याची घटना शिरपूर शहरात घडली आहे. यामुळे शहरासह तालुक्यातील नागरिक भयभीत झाले आहेत.
         चोरी रोखणे चोरांवर वचक बसणे आदी गोष्टींवर संपूर्ण पोलीसांचा वचक असणे गरजेचे आहे.मात्र शिरपूर शहरात तो वचक संपलेला आहे. तीन दिवसा पहिले आमोदे येथून मोटरसायकल चोरी करणाऱ्या एका संशयिताला नागरिकांनी पकडले.परवा भरदिवसा घरफोडी होऊन ६३ हजाराचा मुदेमाल चोरीस गेला.मात्र परवा रात्री चक्क शहरातील चार चाकी इर्टिका गाडीच चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे शिरपूर येथे चोरांची ताकद वाढलेली दिसत आहे.
     शिरपूर शहरातील गणेश काँलनी येथे इर्टिका चोरी झाल्याची घटना घडली आहे.मौलाना ईमतीहाज हे पालनुर (गुजरात) येथून त्यांच्या नातेवाईकांकडे आले होते.रात्री इर्टिका अंगणात लावून सर्व जण झोपले.मौलाना ईमतीहाज हे पहाटे ४ वाजता नमाजासाठी उठले त्यावेळी इर्टिका त्यांना दिसली नसल्याने इर्टिका गाडीची चोरी झाल्याचे त्यांना समजले सायंकाळ पर्यंत याबाबत शिरपूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.यामुळे शहरासह तालुक्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.या चोरांना नेमकं कोणाच अभय भेटत आहे.मोटरसायकल चोरणार्या एकाला नागरिकांनी पकडले त्याच्या सोबत दोन ते तिन साथीदार होते.जे फरार झाले आहेत.त्यांचा शोध घेतला तरी चोरांची मोठी साकळी समोर येऊ शकते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने