जीवनात खेळाला खुप महत्व आहे.अभ्यासाबरोबर खेळ खेळायला हवेत.कारण खेळाच्या माध्यमातून सर्वांगिण विकास होतो.आपल्या व्यक्तीमत्वात खिलाडु वृत्ती येण्यासाठी खेळणे आवश्यक आहे.खेळात जय-पराजय होत असतो,म्हणून खिलाडुवृत्तीने खेळा.पराजय झाला तरी खिलाडुवृत्ती सोडु नका.फार्मसी व इंजिनियरींग क्षेत्रातील विद्यार्थी खेळाकडे वळले आहेत ही कौतुकास्पद गोष्ट आहे
असे प्रतिपादन किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डाॅ तुषार रंधे यांनी केले.किसान विद्या प्रसारक संस्थेच्या बोराडी येथील महाराणी अहिल्याबाई होळकर डी.फार्मसी महाविद्यालयात आंतर इंजिनिरींग डिप्लोमा स्टुडंट स्पोर्टस् असोसिएशन महाराष्ट्र राज्य एफ झोन 2020 यांच्या मार्फत खोखो,कबड्डी स्पर्धांचे उद्घाटन संपन्न झाले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डाॅ.तुषार रंधे होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून शिरपूर तालुका भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल रंधे, संस्थेचे सदस्य शामकांत पाटील,संजय गुजर,इडीसा संघटनेचे सचिव एस.एन.पाटील,प्राचार्य आर.के.बेदमुथा,प्राचार्य एस.व्ही.चोरडीया,प्राचार्य सागर जाधव,एस.आर.चौधरी,दिपेश कर्नावट,चेतन सोनवणे, डाॅ.पी.एच.पाटील,माजी प्राचार्य बी.डी.पाटील,ए.एन.दहीवदकर,सुचित्रा वैद्य,कल्पना पाटील,एस.आर.चौधरी,कल्पेश वाघ इ. उपस्थित होते.
प्रास्ताविकात प्राचार्य महेश पवार यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना औषधनिर्माण शाखेचे शिक्षण मिळावे म्हणून कर्मवीर व्यंकटराव रणधीर यांनी बोराडी सारख्या आदिवासी भागात महाविद्यालय स्थापन केल्याचे सांगितले.
याप्रसंगी धुळे,जळगाव,नंदुरबारे येथील कबड्डीचे 18,तर खो-खोचे 8 संघ आले होते.पंच म्हणून एल.के.प्रताळे, राधेशाम पाटील,चेतन पाटील,जिग्नेश पराळके यांनी काम पाहीले.
सुत्रसंचालन नेहा भामरे,मृगनयन पाटील यांनी केले,तर आभार प्रा.सतिश पाटील यांनी केले
