धुळे येथे एस. व्ही. के. एम. स्कूल ऑफ कॉमर्स तर्फे “जीवन कौशल्य विकास” या विषयावर एकदिवशीय कार्यशाळा संपन्न



धुळे - मुंबई येथील श्री विले पार्ले केळवाणी मंडळ संचलित नरसी मोनजी इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेन्ट स्टडीज (एन. एम. आय. एम. एस.) या अभिमत व स्वायत्त विद्यापीठाच्या धुळे स्थित स्कूल ऑफ कॉमर्स तर्फे “जीवन कौशल्य विकास” या विषयावर एकदिवशीय कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न झाली.

या कार्यशाळेसाठी उद्योगपती, महिला उद्योजक, व्यावसायिक, डॉक्टर्स, चार्टर्ड अकाऊंटंट, वकील, बँकर्स, शिक्षणतज्ज्ञ , होममेकर, विविध क्षेत्रातील लोक व तसेच विध्यार्थी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यशाळेसाठी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. विजय एन. गिरी (प्राध्यापक व्यवस्थापन, आय. आय. टी. खड़गपुर), प्रमुख वक्त्या श्रीमती मीता शहा (ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञ, मुंबई), एस. व्ही. के. एम. धुळे कॅम्पसचे मुख्य सल्लागार अजय पसारी, धुळे कॅम्पसचे संचालक तथा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. समीर गोयल, इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजीचे प्राचार्य डॉ. निलेश साळुंखे, स्कूल ऑफ कॉमर्स चे प्रमुख सी.ए. कुणाल पसारी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच प्रा. राजेंद्र अग्रवाल, प्रा. डॉ. पंकज ढोंडियाल, प्रा. सुब्रहमण्यम, प्रा. संभाजी राव, प्रा. पूजा सदाने आदी मान्यवर देखील उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली.
सदर कार्यशाळेसाठी प्रमुख वक्ते डॉ. विजय एन. गिरी   यांनी "निगोशिएशन आणि डेलीगेशन कौशल्ये" या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख वक्त्या श्रीमती मीता शहा यांनी "भावनिक व्यवस्थापन" या विषयी विस्तृत व सखोल माहिती दिली.
या दोन्ही वक्त्यांच्या शैलीदार भाषणाने उपस्थितांची मने जिंकली. कार्यशाळेसाठी विविध क्षेत्रातील ६० मान्यवर तसेच सुमारे 60 पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ई-सेल (विद्यार्थी समिती) चे सदस्य प्रतिभा चौधरी, राशी शर्मा, ह्रितिक मुंदडा, आदिती गोयल तसेच विद्यालयाचे अधिकारी नितीन चव्हाण, दिनेश देशमुख, नंदकिशोर गोसावी, मंगेश गुजर आदींनी परिश्रम घेतले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने