शिरपूर - तालुक्यातील ताजपूरी येथे संगीतमय व नृत्यासह श्रीमद् भागवत कथा व पंच कुंडात्मक शिवशक्ती महायज्ञ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
पंडित श्री गुरुदेव ललित नागरजी महाराज यांच्या ओजस्मय मधुर वाणीतून श्रीमद् भागवत कथा व पंच कुंडात्मक शिवशक्ती महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. नृत्य संगीत तसेच व्यवस्थापक पंडित श्री संजय नागरजी यांचेही अनमोल योगदान लाभात आहे.
ताजपूरी येथे रविवार दि. 26 जानेवारी 2019 माघ शुद्ध 2 रोजी सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत व सायंकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत कलश यात्रा व यज्ञ प्रारंभ होत आहे. तसेच शोभायात्रेचा प्रारंभ माघ शुद्ध 3 मंगळवार दि. 28 जानेवारी 2020 रोजी सकाळी 8 वाजता करण्यात येत आहे. तसेच संगीतमय श्रीमद् भागवत कथेचा प्रारंभ माघ शुद्ध 3 मंगळवार दि. 28 जानेवारी 2020 ते माघ शुद्ध 9 सोमवार दि. 3 फेब्रुवारी 2020 पर्यंत दररोज दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर यज्ञपूर्णआहुती आणि भागवत आरती भंडारा महाप्रसाद कार्यक्रम माघ शुद्ध 9 सोमवार दि. 3 फेब्रुवारी 2020 रोजी दुपारी 12 वाजता संपन्न होत आहे.
कार्यक्रमाचे आयोजन ताजपूरी येथील समस्त मगर परिवार, शिवराजे मित्र मंडळ, समस्त ग्रामस्थ मंडळी यांनी केले आहे. या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Tags
news