सांजवेळ म्हणजे मावळता मंद परतीचा प्रकाश आणी येणारा अंधार यातील दुवा म्हणजे सांज. सूर्य कलत असतांना प्रकाशाचा दिवस सम्पुन अंधाराची वाट पाहत असतो ती वेळ. तसं पाहिलं तर हि वेळ खुप छान मोहक सुंदर असते नव्हे भासते. याचा अर्थ असा वाटतो अंधारात लोटत असतांना प्रकाश पर्व सम्पत असतांना शेवट सुद्धा छान वाटतो.
सर्व जीव आपल्या आपल्या घरी, खोप्यात, गुहेत, बिळात, परतत असतात. जे प्राणी प्रकाशात आपला उदरनिर्वाह भागवता न्हवे जीवन जगण्याच साहित्य अन्न गोळा करता अगदी मानव सुद्धा दिवसा सारं पोटभरण्या आपल्या कुटूंबा साठी खटाटोप करून थकुन परतण्याची आपल्या कुटूंब सोबत राहायची नर मादी एकत्र बसुन विचार करण्याची आजच काय उदया काय करायच वेळ असेल तर बाहेर फिरायला जायच थोडं. वेगळं सांगतो प्रेमी युगुल पण मस्त छान नदी, समुद्र किनारी, बागेत बसायची वेळ हातात हात घेऊन फिरायची वेळ मन भरून घेण्याची विचाराची शुद्ध हवेची वेळ सांजवेळ. आपल्या दिवसाची शेवटची वेळ . अगदी निद्रस्त होण्या साठी पूर्व तयारी ची वेळ म्हणजे शुभ सांज. अंधार येणार दृष्ट प्रवृत्ती जागरूक होणार म्हणुन देवाचं नामस्मरण करण्याची वेळ. निशाचर प्राणी यांच्या अंधारातील दृष्ट, भक्षक, वाईट कृत्य करणाऱ्या वाईट प्रवृत्ती यांची जागे होण्याची जगण्याची वेळ त्यांच्या अंधाऱ्या दिवसाची सुरवात तरी मोहक सुंदर प्रकाश आणी रात्री ची संगम वेळ आपल्या साठी सकाळ जशी सुंदर तशी येणाऱ्या रात्री साठी हि सांजप्रभा एक अंत तर तेथेच दुसरी सुरवात होते अगदी तसंच आहे.
दिवसाची सुरवात होऊन मध्यान नंन्तर सांज शेवट आपल्या साठी तर रात्री साठी मोहक सुंदर सुरवात.
हे झालं दिवस रात्री चं शास्र अगदी तसंच आपल्या जीवनाचं असतं बालपण तारुण्य आणी वृद्धापकाळ. वृद्धापकाळ म्हणजे सांज बालपण जस मोहक तसंच वृद्धापकाळ सुद्धा तसं पाहिले तर सुंदर असते. या काळात मुलं मोठी झाली असतात आपापली कामात मग्न सेटल झाली असतात. नातवंड खुशीत नाचत बागळत असतात म्हणजे वृद्धापकाळ हा बालपण तारुण्याची उपलब्धी पाहण्याचा सोहळा. तो उपभोगता आला पाहिजे मनात भरून घेतला पाहिजे आपला वृद्धकाळ त्या काळात देवाचं नामस्मरण देव देव करण्याचा काळ आणी हि तर आपलीच पुढील पिढी ची सुरवात जुन्या नव्या चा संगम अगदी ते ती सांज समजु.. हे चं जीवन चक्र आहे. तसंच दिवस रात्री याचा संगम उगम सर्व गुण मिश्रित लोभस क्षण ती सांज वेळ... मी माझ्या अल्पश्या बुद्धी तुन सांज आणी वृद्ध तसं नाही पण दाखवलं खुप फरक आहे. दिवस रात्री म्हणजे चांगलं वाईट असं आहे..आणि तसं पाहिले तर जीवन चक्र हे उदाहरण म्हणून घेतलं आहे.....
प्रदीप मनोहर पाटील
मु. पोस्ट. गणपूर
ता. चोपडा जिल्हा. जळगाव
पिन. 425108
मोबाईल. 9922239055©®