मराठा महासंघ महिला कार्यकारिणीच्या वतीने राजमाता जिजाऊ माँसाहेब जयंती उत्साहात साजरी।






नाशिक ( शैलेश सणस )राजमाता जिजाऊ माँसाहेब जयंतिनिमित्त कालिका मंदिर सभागृह येथे राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि महिलांचा हळदीकुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला।
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि जिजाऊ वंदनेने करण्यात आली।
स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले।
यावेळी शिव व्याख्याते सोपान वाटपाडे सर यांनी माँसाहेब जिजाऊ यांचा ईतिहास आपल्या ओघवत्या शैलीत वर्णन केला।
महासंघाचे शहराध्यक्ष चंद्रकांत बनकर यानी यावेळी महासंघाच्या कार्याची माहिती दिली।
महिला आयोग सदस्या सौ. रोहिणिताई नायडू यांनी महिलांच्या समस्या आणि बचत गटाची माहिती आणि कार्य विस्तृतरित्या मांडल्या।
महिला शहराध्यक्ष सौ. शोभाताई सोनवणे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून महिलांतर्फे राबविन्यात येणारे उपक्रम आणि महासंघाची कार्य सांगितली तसेच स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची महती वर्णन केली।
यावेळी व्यासपीठावर कालिका मंदिर देवस्थानचे केशव अण्णा पाटील, मराठा महासंघाचे सरचिटणीस अजय मराठे, अविनाश वाळुंजे, विष्णु अहिरे, आदींसह मान्यवर उपस्थित होते.
 या प्रसंगी नीलेश दूसे सर, महेश जाधव, ऎड सोनल कदम निफाडे, रोहिणी ताई दळवी, योगिता शिंदे, अनिता पाटील, रुपाली सोनवणे, सुनीता वाकचौरे, पूजा शिनगार, ज्योती जाधव, रंजना सायखिंडीकर, राजश्री भावसार, सुवर्णा पाटील, स्वाति जाधव, रोहिणी उखाडे, प्रमिला पाटील कामिनी भानुवंशी, ऎड अलका शेळके मोरे पाटील, योगिता पाटील, वनिता शिंदे, ज्योती नवले, कीर्ति शिंदे, वैष्णवी भावसार आदि उपस्थित होते।
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सई खरोटे यांनी केले आणि आभारप्रदर्शन अविनाश वाळुंजे यानी केले।
टिप:आपल्या नामांकित दैनिकामध्ये यथोचित प्रसिद्धी द्यावी,ही विनंती.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने