तस पाहिलं तर शिक्षण म्हणजे काय?हे आपण समजुन घेऊ अगोदर. ग्रामीण असो शहरी लहान मुलं असो वा वयस्कर वृद्ध तरुण यांचे शिक्षण तर जन्म पासून तर मरे पर्यंत शिक्षण चालूच असतं. किती पण शिकलो शिकत राहिलो तरी शेवटी अपूर्णच असतं आणी आहे.जीव मग कुठला पण असो त्यास थोडं जगायचं राहायचं चालायचं बोलायचं वागायचं कसं त्यास त्याचे आईवडील प्रथम शिक्षण देतात आणी मग ईतर प्राणी समाज त्या कडून शिक्षण घ्यावं लागतं घेत राहावं लागते. पूर्वी मानव असो प्राणी यात फरक न्हवता म्हणजे फरक होता पण जगण्याचा फरक न्हवताअसं. सर्व प्राणी आपण आपलं जीवन राहणीमान आपल्या आकलन शक्ती प्रमाणे आपला उदरनिर्वाह करत. इतकी बुद्धिमत्ता होती तत्कालीन कोणता प्राणी कसा रहातो घर कुठं बांधतो पक्षी कसे उडत आहेत वेळ कोणती अचूक सांगत कुठला तारा कुठं आला तर काय होईल पाऊस कसा पडेल हे सारं सारं सारे प्राणी आपल्या श्रवण शक्ती ने सांगत बोध घेत असतं असं वाटते नव्हे अगदी खरं आहे. अगदी मानव सह. एक उदाहरण म्हणुन सांगतो गावात कुत्रे रात्री रडायला लागली की समजायचं कोणी तरी मरण पावेल असं. कुत्रा हा प्राणी पण त्यास कसं कोठून समजे आणी समजते की कुणी मानव मरण पावेल असं. आकलना पलीकडे आहे. कावळा घरा जवळ कावकाव करत असेल तर घरी कोण तरी पाहुणे येणार किंवा काही निरोप तरी येणार हे त्रिकालाबाधित सत्य आहे. हि साऱ्या प्राण्यांची निरीक्षण आकलन शक्ती सारे एकमेकांना सांगत नव्हे बोलत असत खुणा करत असत. अगदी पीक पेरा पेरणी करा असं पीक पेरो पीक पेरो.असं पक्षी मानवास ओरडुन सांगत.काही संकट येणार त्याची माहिती पशु पक्षी देत असत देतात त्याच्या हालचाली वरून आवाज वरून सारं समजे. एक एकमेकांना पूरक राहणीमान जीवसृष्टी चे होतं.. माणुस माघ काढून चोर यास पकडे किंवा कुत्रा याची मदत घेऊन स्वान गधं वरून चोराचा शोध घेत आणी घेत असतो.. याचा अर्थ जीवसृष्टी हि एकमेकांना पूरक एकमेकांचं शिकुन जीवन जगत होती असंच होतं... आपला विषय माणसाच्या शिक्षणाचा आहे... पण त्यात मानव हुशार प्राणी ईतर प्राण्यांन पासून वेगळा कालांतराने त्यानं शिक्षण पद्धत गुरुकुल नंन्तर आधुनिक युगात शाळा यात रूपांतर केल. जुने विसरून नवं अवलंबलं सृष्टी पासुन वेगळं पडत चाललं नव्हे वेगळे पण आधुनिक पणा अवलंबला.. शिक्षण ग्रन्थ, गाथा पुस्तकं, कविता, लेख, शाळा कॉलेज निर्माण करून शिक्षण घेऊ लागला....
आज पासून 15ते 20 वर्ष पूवीं ते इंग्रज काळा पासुन शाळा शिक्षण पद्धत सुरु झाली तो काळ. ग्रामीण असो वा शहरी खुप छान जगण्यास पूरक होती असं वाटते. शिक्षक अगदी मनापासून शिकवत असत गावात एक शिक्षक असे त्यास पुर्ण गावात मान सन्मान असे त्याच कारण शिक्षक हा पूर्ण गावास योग्य दिशा मार्गदर्शन करत असे विद्यार्थी असो वा गावकरी त्या शिक्षकाची जीवन राहणीमान शिकण्याची पद्धत अवलंबे पण अलीकडे सर्व चित्र वेगळं झालं बाजारी करणं झाले शिक्षणाचे शिक्षक गावात राहात नाहीत त्यांची चं मुलं शहरात शिकतात ते शाळेच्या वेळ पुरतं येतात आणी जातात शिक्षक गावकरी विद्यार्थी हा दुवा आता संम्पला असं वाटतं.त्याला मिळणारा मान सन्मान पण कमी झाला. त्याच्या वागणुकी मुळेच. सर्व नाही तरी पण तसंच आहे. नावाला शाळा आणी शिक्षण सुरु आहे मुलं शिकतात पण शिक्षक पण विद्यार्थी पण हरवत चाललंय असंच दिसते.. शहरात थोडं बरं आहे असं वाटत पण पैसा असेल तरच खरं आहे सारं पैश्या वर पैश्या करता शिक्षण शिकवणी सुरु आहे आपलं पण संपलं असं दिसतं गरीब मुलं यांनी एक लक्ष्यात ठेवायला पाहिजे या बाजारी करणात टिकायचं असेल तर गुणवंन्त विद्यार्थी म्हणुन आपल्या परीने पुढे गेले पाहिजे अभ्यास असा करायचा कि कुठं पण गेलो तरी सर्वात पुढे आपला दबदबा राहिला पाहिजे शासन सोई सवलत याचा फायदा हुशार असेल तरच मिळतो.... अंगात हुशारी असेल तर पैसे वीणा शिक्षण होऊ शकत नोकरी व्यवसाय करू शकतो सैदव लक्ष्यात ठेवावं बुद्धिमत्ता आत्मसात करायची शाळेत शिकवत असतात त्या पेक्षा वेगळं जास्त वाचन मनन हवं... आधुनिक पद्धत अवलंबुन शिक्षण घेत राहिले पाहिजे...नवं नवीन शैक्षणिक पद्धतीने पुढे गेले पाहिजे शिक्षक असो वा नसो शिकलं पाहिजे आपल्यातील हुशारीनं असंच आहे आत्मसात आपण केलं पाहिजे चिंतन, श्रवण, मनन, वाचन करून...विषय माझ्या अल्प बुद्धी नुसार लिहलं आपणास पटेल असा आग्रह नाही पण पटेल अशी इच्छा आहे.....
लेख कसा आहे कृपया सांगावे विनंती
उत्तर द्याहटवा