एच. आर. पटेल कन्या मराठी प्राथमिक शाळेत भरला बालगोपाळांचा आनंद मेळावा



शिरपूर - येथील एच. आर. पटेल कन्या प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा, नववर्ष भेट कार्ड स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

या दोन दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे सीईओ डॉ.उमेश शर्मा यांनी केले. गटशिक्षणाधिकारी एस.सी. पवार, शिक्षण विस्तार अधिकारी डॉ.नीता सोनवणे, केंद्रप्रमुख अनिल बाविस्कर, नगरसेवक आशा बागूल, समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र माळी, दिलीप बोरसे, महेंद्र महाजन, लायनेस क्लब शिरपूरच्या कविता बाविस्कर, रत्नप्रभा सोनार, मीनाक्षी राठी, लता अग्रवाल, संध्या जैन, नलिनी राठी, सरोज चव्हाण, प्राचार्य आर. बी. पाटील आदी उपस्थित होते.
सरस्वती पूजनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. मुख्याध्यापक गणेश साळुंके यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. आनंद मेळावा, रांगोळी व भेट कार्ड स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थिनींनी आनंद मेळाव्यात विविध पदार्थांचे स्टॉल लावले होते. विद्यार्थिनींनी पालकांच्या मदतीने बनवलेल्या विविध पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आलेले होते. पालकांनी, विद्यार्थ्यांनी तसेच मान्यवरांनी या पदार्थांचा आस्वाद घेतला. भेटकार्ड स्पर्धा व रांगोळी स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले. या स्पर्धांचे परीक्षणाचे काम स्वाती  जगदाळे व वैशाली सोनवणे यांनी केले.
कार्यक्रमाच्या दुसर्‍या दिवशी वेशभूषेचा रंगतदार कार्यक्रम सादर करण्यात आला. बालवाडी ते दुसरी अशा पहिल्या गटातून सुमारे १८ विद्यार्थिनींनी तसेच  तिसरी व चौथी चे १२ असे एकूण ३९ विद्यार्थिनींनी आपल्या वेशभूषा सादर केल्या.
विद्यार्थिनींनी विविध विषयांवर वेशभूषा सादर करताना समाजप्रबोधनावर प्रकाश टाकला. आपल्या अभिनयाच्या माध्यमातून आपले विचार मांडले. वेशभूषा स्पर्धेचे परीक्षण पूनम पाटील, सुलभा भोंगे व इंदिरा गिरासे यांनी केले.
भेटकार्ड स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व वेशभूषा स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यु. के. पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने