लक्ष्मी नारायण मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न




पोलादपुर--( शैलेश सणस )सन  २०२० वर्षाचा अखंड हरिनाम सप्ताह लक्ष्मी नारायण मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक,  तुर्भे, पोलादपूर येथे  मोठ्या हर्षोउल्हासात साजरा झाला.  हजारो भाविक महाराष्ट्राच्या तसेच गुजरातच्या कानाकोपऱ्यातून आले होते.  सद्गुरू मोरे माऊली यांच्या अधिष्ठानाखाली तसेच दादा महाराज मोरे माऊली यांच्या प्रेरणेने सदर हरिनाम सप्ताहाची सांगता मंगळवार दिनांक 21 जानेवारी रोजी मोठया भक्ती भावाने करण्यात आली. चार दिवस किर्तनकारांनी आप आपल्या किर्तनातून व प्रवचनातून समाजप्रबोधन केले. 
ह.भ.प. दगडू बाबू उतेकर,  गणेश गोळे,  नारायण गोळे,  व त्यांच्या सहकाऱ्यांनी, महिलांनी केलेली  सकाळची  काकडा आरती,   ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ यांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झालेले दिसून येत होते.  जेष्टांबरोबर,  तरुण,  तसेच लहान बालके मोठया उत्साहाने सहभागी झालेले दिसत होते. 
श्री लक्ष्मी नारायण मंदिर समिती, मुंबई व ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित केलेला "आधार योजनेचा" कार्यक्रम संपूर्ण तालुक्याचे आकर्षण ठरला.   समाज प्रबोधना बरोबर सामाजिक बांधिलकी काय असते याचे उत्तम उदाहरण म्हणजे आधार योजना हे  ग्रामस्थांनी समाजाला दाखवून दिले. आधार योजनेचा सत्तर लाभार्थ्यांनी लाभ घेतला. नेत्र तज्ञ् जर्नालसिंग गौड आणि मी 24 तास चॅनेल चे संपादक श्री अनंत गोळे यांच्या विद्यमाने आयोजित केलेल्या नेत्र चिकित्सा शिबीराला ग्रामस्थांनी उत्फुर्त पाठिंबा दिला. 
महिलांसाठी आयोजित केलेला "हळदी कुंकू" कार्यक्रम ग्रामस्थ तसेच मुंबईकर महिलांची एकता दाखून देत होती. 
मागील वर्षापासून,  नामयज्ञ, नामज्ञान व सांप्रदायिक कार्यक्रमा सोबत वरील सामाजिक कार्यक्रम राबविण्यात येत असतात, सदरील कार्यक्रमांना सुद्धा मुंबई व ग्रामस्थ यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असतो. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी 
तुर्भे ग्रामस्थ पुरुष, महिला, मुले व मुली यांनी  अथक शारीरिक परिश्रम घेतले.  आधार योजनेसाठी पनवेलहून पत्रकार मिलिंद खारपाटील उपस्थित राहिले होते. मुंबई अध्यक्ष श्री हरिश्चंद्र गोळे,  सचिव संजय गोळे, ग्रामस्थ अध्यक्ष कॅप्टन बापू शिंदे,  सचिव रत्नकांत शिंदे,  विजय अंधारे,  रवींद्र पांडुरंग शिंदे,  लाडूराम शिंदे,  पांडुरंग साळुंखे,  चंद्रकांत कृष्णराव शिंदे,  नरहरी गोळे,  नामदेव गोळे,  अमृता वाडकर, शिवाजी मोरे,  हनुमंत गोळे, सखाराम गोळे,  दाजी गोळे,  गणेश बांदल,  दिलीप गोळे,  भगवान शिंदे, अनिल गोळे,  अर्जुन वाडकर,  प्रकाश वाडकर, काशिनाथ मरगजे,  हरिभाऊ शिंदे,  मनोहर शिंदे,  प्रदीप दीक्षित,  शिवराम गोळे,  राधाबाई जाधव,  इंदुबाई गंगाराम  गोळे,  लीलाबाई विठ्ठल वाडकर, लक्ष्मी बाबाजी वाडकर,  वंदना गोळे,  गंगाबाई महादेव गोळे,  सावित्रीबाई वाडकर,  शेवंती बळीराम साळुंखे, रुक्मिणी बाबाजी गोळे, चंद्राबाई वाडकर, विष्णू रामचंद्र गोळे,  पार्वती सकपाळ,  देवकाबाई मोरे,  देवकाबाई बाळू गोळे,  ज्ञानेश्वर बांदल,  गौरव शंकर गोळे, शेवंती बाबू गोळे,  पांडुरंग गोळे, पांडुरंग शिंदे, गणपत गोळे,  विलास शिंदे, यशवंत गोळे, कलाबाई कृष्णा गोळे,  विठाबाई गोळे,  उज्वला गोळे,  सविता गोळे,  संगीता गोळे,  नंदा गोळे, जयश्री बबन गोळे, मुक्ता गोळे, जनाबाई शिंदे,  लक्ष्मीबाई गोळे,  सुलोचना पांडुरंग पवार,  यशोदा वाडकर, लीलाबाई देवजी गोळे,  अनाजी शेलार,  अतुल अनंत शेठ, अंजली शेठ,  भोरू शिंदे, विठोबा शिंदे, वैभव शिंदे, वासंती भावे आदींनी प्रचंड मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने