मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांच्या हस्ते युवारंगाची सांगता



कल्पेश राजपूत, शहादा 

शहादा - युवारंगाची सुरुवात व पथसंचालनकवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विध्यापिठाचा विधार्थी विकास विभाग आणि पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शहादा यांचा संयुक्त विध्यामाने युवारंगाचे सादरीकरण दिनांक १६ जानेवारी २०२० पासून शहादा येथे विद्यापीठ स्तरीय युवक महोस्तवाला प्रारंभ झाला. दिनांक १६ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजेपासून संघांचे आगमन विद्यालयाच्या प्रांगणात झाले होते. सहभागी महाविद्यालयांनी पथसंचालनास दुपारी २ वाजता मोहिदा रोड (महात्मा फुले चौक) पासून सुरुवात झाली. त्यावेळी पथसंचालनाची सुरुवात मंडळाचे अध्यक्ष श्री.दिपकबापू पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवीला व व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील व प्रा.नितीन बारी, प्रा.मोहन पावरा, विवेक लोहार, अधिष्ठाता प्रा. ए.बी.चौधरी, प्राचार्य. लता मोरे, प्रा.पी.पी.छाजेड, प्राचार्य.आर.एस.पाटील, या पथसंचालनात ५० महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग घेतला होता. यात प्रामुख्याने राष्ट्रीय एकात्मता, रस्ता सुरक्षा अभियान, पर्यावरण, व्यसन निधनतेचे अभियान, व्यसनमुक्ती, वृक्षरोपण, सोशल मिडीयावर आधारित गेलेली पिढी, कॅन्सरला आळा, राष्ट्रीय साक्षरता आदी व्दारे जनजागृती चा संदेश नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम  विध्यार्थीसादर करत होते. काही महाविद्यालयांनीढोल व लेझीम च्या तालावर नृत्य करीत  ट्रक्टर, घोडा, वाहनांवर, सजीव असे देखावे सादर केले होते.

*युवारंग महोत्सवाची जल्लोषात सांगता*

गेल्या पाच दिवसांपासून सुरु असलेल्या "युवारंग" महोत्सवाची सांगता जल्लोषात पारितोषिक वितरण सोहळ्याने झाली या सोहळ्याचे प्रमुख असे आकर्षण होते ते मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे...! मान्यवरांच्या उपस्तिथीत विजयी स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात आले यावेळीही तरुणाईंचा जल्लोष मोठ्या संख्येत पहावयास मिळाले. मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांची झलक टिपण्यासाठी तरुणाईंमध्ये जणू काय स्पर्धाच लागली होती. युवकांचा जल्लोष तर काहि तारुणांना फोटो व सेल्फी घेण्याची संधी तरुणाईंना  मिळाली होती. प्रार्थना बेहेरे यांच्या हस्ते पूर्ण पारितोषिक वितरण सोहळा पार पाडण्यात आला व त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले, त्यावेळी युवकांचा जल्लोष तर कमी होईना असा होता.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने