शिरपूर - येथील आर. सी. पटेल इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी डिप्लोमा च्या विद्यार्थ्यांनी इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट असोसिएशन (IEDSSA) महाराष्ट्र राज्य एफ झोन २०२० आयोजित विविध विभागीय खेळ स्पर्धांमध्ये यश संपादन केले. सर्व यशस्वी खेळाडू यांचा गौरव केला.
विद्यार्थ्यांची बौद्धिक विकासासह शारीरिक बळकटी हा देखील महत्वाचा विषय आहे. खेळ मनुष्याचं शारीरिक जडणघडणी बरोबरच जीवनात खेळाडू वृत्तीने पुढे जाण्याचं पण शिकवतो. संघात काम करणे, नियमाने प्रतिस्पर्ध्याला आपल्या कौशल्याने मागे टाकणे, विजयाचा उन्माद न करता उपविजेत्याबरोबर सौहाद्रतेने वागणे अश्या अनेक गुणांना खेळ स्पर्धांमधून वाव मिळतो.
हाच दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये वाढीस लागावा म्हणून आर. सी. पटेल इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी डिप्लोमा च्या विद्यार्थ्यांनी IEDSSA ने वेगवेगळ्या कॉलेजच्या सहभागाने आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये सहभाग घेत दि. ९ जानेवारी रोजी अक्कलकुवा येथील बॅटमिंटन, टेबल टेनिस, दि. १० ला वाडीभोकर येथील व्हॉलीबॉल, बास्केटबॉल स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली. दि. ११ ला धुळे येथे घेण्यात आलेल्या मैदानी खेळ रिले, धावस्पर्धा या प्रकारात पावरा राजेश सुरेश, पावरा रोहित लक्ष्मण, पाटील तुषार संतोष, पवार मयूर सुनील यांनी ४०० मीटर रिलेत द्वितीय क्रमांक पटकावून स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र तर धावणे या प्रकारात पावरा राजेश सुरेश याने १०० मीटर धावण्यात प्रथम क्रमांक पटकावून स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र मिळवले.
याच दिवशी घेतल्या गेलेल्या कुस्ती या प्रकारात पाटील तुषार संतोष याने द्वितीय क्रमांक पटकावून स्मृतीचिन्ह प्रमाणपत् र, तर वेट लिफ्टिंग या प्रकारात ठाकरे दर्शन सोमनाथ याने प्रथम क्रमांक पटकावून स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र मिळवले. पुढे पंढरपूर येथे होणाऱ्या १६ विभागांच्या राज्य स्तरीय वेट लिफ्टिंग स्पर्ध्येत सहभागी होण्यासाठी तयारी करीत आहे. त्यातही तो यश खेचून आणेल असा सर्वांना विश्वास आहे.
दि. १३ ला अक्कलकुवा येथे फुटबॉल या स्पर्धांप्रकारात विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. दि. १४ ला पारोळा येथे बुद्धिबळ, दोंडाईचा येथे कॅरम, तर बोराडी येथील कबड्डी, खो-खो या स्पर्धांमध्ये पण विद्यार्थ्यांनी पुढच्या फेरी गाठत आपला दखलपात्र सहभाग नोंदविला.
दि. १६ ते २० दोंडाईचा येथील क्रिकेट स्पर्धेत विविध महाविद्यालयाच्या १२ संघांमधून आर. सी. पटेल च्या संघाने चमकदार कामगिरी केली.
दि. २० रोजी झालेल्या १६ विभागांच्या राज्यस्तरीय मैदानी खेळ रिले धावस्पर्धा या प्रकारात पावरा राजेश सुरेश याने यशस्वीरीत्या चतुर्थ क्रमांकासह आकर्षक प्रमाणपत्र प्राप्त केले.
विद्यार्थ्यांना यशस्वितेसाठी प्राचार्य डॉ. नितीन हासवाणी यांचे मार्गदर्शनात खेळ समन्वयक प्रा. अश्विन कुमार तोरणे, प्रा. गोविंदा भंडारी, प्रा. सौ. संगीता बडगुजर, प्रा. प्रदीप पाटील, प्रा. सुघोष उपासनी, प्रा. घनश्याम गिरनार, प्रा. पूजा मुंदडा, प्रा. युवराज पावरा, प्रा. दीक्षित पाटील, प्रा. धनराज महाजन, दिनेश चौधरी, दीपक जाधव, सुजित राजपूत, अशोक पावरा, अक्षय पावरा आदीं परिश्रम घेत आहेत.
शिरपूर एज्यूकेशन संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री अमरिशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संचालक भूपेशभाई पटेल, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. संजय सुराणा आदी मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
Tags
news
