अमित राज ठाकरेंची मनसेच्या नेतेपदी निवड

मुंबईः मनसेच्या महाअधिवेशनात अमित ठाकरेंचीमनसेच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. बाळा नांदगावकरांनी हा प्रस्ताव मांडला असून, त्याला इतरांनी अनुमोदन दिलं आहे. त्यानंतर अमित ठाकरेंनी मंचावर येत भाषणातून भावना व्यक्त केल्या. सर्वप्रथम मला राजसाहेबांना खूप खूप धन्यवाद द्यायचे आहेत. मी ठराव मांडणार असल्याचं त्यांनी मला काळ संध्याकाळी सांगितलं. पायाखालची जमीन सटकणं काय असतं हा अनुभव मला त्यांच्यामुळे मिळाला.त्यांचे खूप खूप आभार. येत्या दोन महिन्यात पक्षाला 14 वर्ष पूर्ण होतील. त्यामुळे आपण 14 वर्षं पकडूनच चालू. 14 वर्षांतलं हे पहिलं अधिवेशन असून, मी पहिल्यांदाच व्यासपीठावर बोलतो आहे. त्यामुळे माझ्या आयुष्याचा हा खूप मोठा दिवस आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने