4 हजार सरपंचांना पाठविणार पत्र हवामान अनुकूल कृषी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी कृषी मंत्र्यांचा सरपंचांशी पत्राद्वारे संवाद


मुंबईदि. 21 : बदलत्या हवामानास तोंड देण्यासाठी गाव अधिक सक्षम करण्याकरिता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सहभागी गावातील सरपंचाना कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी पत्राद्वारे संवाद साधत प्रकल्पासंदर्भात जाणीवजागृती करण्याचे आवाहन केले आहे.
                राज्यातील विदर्भमराठवाडा भागातील सुमारे ५००० गावांमध्ये जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने हवामान अनुकूल कृषी प्रकल्प (नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प) राबविण्यात येत आहे. या गावांमध्ये प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी होण्यासाठी कृषी मंत्री श्री. भुसे यांनी आज प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला.  
कृषी मंत्री झाल्यानंतर प्रथमच या प्रकल्पातील सहभागी गावांच्या सरपंचांशी पत्राद्वारे त्यांनी  संवाद साधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसारया प्रकल्पातील सहभागी गावातील सुमारे ४०००  सरपंचांना त्यांनी पत्र पाठविले आहे. सरपंचांना लिहिलेल्या पत्रामध्ये कृषी मंत्री यांनी म्हटले आहेलहान शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी सक्षम करणे व शेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होण्यासाठी प्रयत्न करणे  हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. त्यासाठी गावांमध्ये ग्राम कृषी संजिवनी समिती स्थापना आणि विविध कामांची अंमलबजावणी सुरु आहे. प्रकल्पांतर्गत समाविष्ट कामांची व लाभांची सविस्तर माहिती सरपंचांना प्रकल्प अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आलेली आहे.
आत्तापर्यंत प्रकल्पांमध्ये  शेतकऱ्यांच्या वैयक्तिक लाभासाठीच्या मागण्यांमध्ये शेततळेविहीरपाणी उपसा साधनेशेळीपालन या बाबींवर अधिक भर असल्याचे दिसून येत आहे. बदलत्या हवामानास तोंड देतानाच आपल्या गावाचा सर्वंकष विकास करावयाचा उद्देश सफल करण्यासाठी वृक्ष लागवडफळबाग लागवड, पाणलोट विकास क्षेत्र, जमिनीचे आरोग्य व्यवस्थापनसुक्ष्मसिंचन (तुषार सिंचन व ठिबक सिंचन) तसेच खारपाण पट्टयातील गावांमध्ये शेततळी या घटकांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. याशिवाय युवकांना व महिलांना कृषी आधारीत उद्योगांकडे वळविण्यासाठी रेशीम उद्योगमधुमक्षिका पालनगोड्या पाण्यातील मत्स्यशेतीशेडनेट/ पॉलिहाऊस उभारणीबिजोत्पादन इ. घटकांवर भर देणे गरजेचे आहे.
                गावातील शेतकरी व महिला बचतगटांना कृषी आधारीत उद्योग उभारणीस प्रोत्साहन देण्यासाठी प्रकल्पांतर्गत  अर्थसहाय्य व लाभार्थ्याने गुंतवणूक करावयाचे भांडवल याबाबत सविस्तर माहिती प्रकल्पाचे समुह सहाय्यक / कृषि सहाय्यक यांच्या मार्फत दिली जाणार आहे.
                शेतीमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेले गरजू आणि प्राधान्याने समाजातील अनुसूचित जाती / जमातीमहिला व दिव्यांग शेतकऱ्यांपर्यंत प्रकल्पाची  माहिती पाहोचेल यासाठी जाणीपूर्वक प्रयत्न करण्यात यावेत, असेही कृषीमंत्री श्री.भुसे म्हणाले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने