शिरपूर च्या एच.आर.पटेल कन्या माध्यमिक विद्यालयाची श्रद्धा सोनगडे महाराष्ट्र संघाची कर्णधार

 

शिरपूर - येथील शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित शिरपूर च्या एच.आर.पटेल कन्या माध्यमिक विद्यालयातील श्रद्धा सोनगडे हिची शालेय 14 वर्षे आतील कबड्डी संघात सलग दुसऱ्यादा निवड झाली असून त्यात तीने महाराष्ट्र संघाचे कर्णधार म्हणून कामगिरी केली आहे.

शालेय 14 वर्षे गटात नाशिक विभागातून तिची एकमेव निवड महाराष्ट्र संघात झाली होती. 12 जानेवारी ते 16 जानेवारी 2020 कालावधीत दुर्ग छत्तीसगड येथे राष्ट्रीय शालेय कबड्डी स्पर्धा आयोजन केले होते. त्यात महाराष्ट्र मुलीचा संघ सहभागी झाला होता. महाराष्ट्र संघाचे कर्णधार म्हणून शिरपुची श्रद्धा सोनगडे ची निवड करण्यात आली. श्रध्दा सोनगडे हिचा चांगल्या पकड व चढाई चा जोरावर महाराष्ट्र संघ साखळी सामन्यात उपविजेता ठरला. 
श्रद्धा ला तिचे प्रशिक्षक भुषण चव्हाण, निखिल महाजन, क्रीडा समन्वयक राकेश बोरसे, क्रीडाशिक्षक पी.बी.धायबर याचं मार्गदर्शन लाभले.

संस्थेचे अध्यक्ष माजी शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री अमरिशभाई पटेल व नगराध्यक्षा जयश्रीबेन अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते काल श्रद्धा सोनगडेचा गौरव करण्यात आला.

श्रद्धा च्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल व राष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी बद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, संस्थेचे कार्याध्यक्ष भुपेशभाई पटेल, नगरसेवक तपनभाई पटेल, चिंतनभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, वित्त धिकारी नाटूसिंग गिरासे, क्रीडा विभाग प्रमुख प्रितेेश पटेल, सीईओ डॉ.उमेश शर्मा, प्राचार्य सिद्धार्थ पवार, प्राचार्य आर.बी.पाटील यांनी कौतुक केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने