शरीरातील ऊर्जा बाहेर पडण्याचे साधन म्हणजे खेळ - निशांत रंधे




खेळ व व्यायाम या दोन्ही गोष्टी माणसाला सकारात्मक आयुष्य जगायला शिकवत असतात.नियमित खेळ खेळणारी व्यक्तीच्या शरीरात सकारात्मक ऊर्जा तयार होते.व शरीरातील ऊर्जा बाहेर पडण्याचं साधन म्हणजे खेळच आहे.यामुळे शरीर व मन सुदृढ होते.मोबाईलचे खेळ खेळण्यापेक्षा मैदानी खेळ खेळा असे प्रतिपादन संस्थेचे सचिव निशांत रंधे यांनी केलं
किसान विद्या प्रसारक संस्थेच्या बोराडी येथील महाराणी अहिल्याबाई होळकर डी.फार्मसी महाविद्यालयामार्फत अंतर्गत इंजीनियरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र राज्यस्तरीय  2020 ऍथलेटिक्‍स स्पर्धांचे उद्घाटन  शिरपूर येथील दादासाहेब विश्वासराव रंधे क्रीडा मैदानावर संपन्न झाले.याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव निशांत रंधे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे शिरपूरचे नगरसेवक रोहित रंधे,प्राचार्य एन. जे.हसवानी,डाॅ.पी.एच.पाटील,प्राचार्य महेश पवार,कल्पेश वाघ,महेंद्र पाटील,निलेश माळी इ.उपस्थित होते.महाविद्यालयाचे प्राचार्य महेश पवार यांनी प्रास्ताविकात सांगितले की,बोराडी,शिरपूर सारख्या ग्रामीण भागात विभाग व राज्यस्तरावरील क्रीडा स्पर्धा घेण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष,जि.प.अध्यक्ष डाॅ.तुषार रंधे व संस्थेच्या पदाधिकारींचे प्रोत्साहन मिळते.यामुळे विद्यार्थ्याना पुढे जाण्याची संधी मिळत आहे.
 या राज्यस्तरीय स्पर्धांसाठी पुणे,कोल्हापूर,औरंगाबाद,मुंबई,इचलकरंजी,नागपूर येथुन संघ आले आहेत.यात धावण्याच्या स्पर्धा,गोळाफेक,भालाफेक,थाळीफेक,लांबउडी,ऊंचउडी,इ.मैदानी स्पर्धा होत आहेत
स्पर्धाचे परीक्षण चेतन पाटील,दिनेश पाटील,एल के प्रताळे,नूर तेली,प्रमोद पाटील यांनी केले तर स्पर्धांच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन नेहा गणेश भामरे,श्रद्धा बडगुजर यांनी केले तर आभार प्रा.सतीश पाटील यांनी व्यक्त केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने