.
शिरपूर - सर्व उपस्थित महिलांचे सहभागी झाल्याबद्दल आभार मानते. पायी चालण्याचे महत्व खूपच असून सुदृढ राहण्याचा प्रयत्न करावा. सर्वांनी आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रयत्न करावा, सर्वांनी नियमित पायी चालणे गरजेचे आहे. शिरपूर नगरपालिकेच्या वतीने 3 गार्डन मध्ये अनेक सुविधा उपलब्ध केल्या असून महिलांसाठी खास लेडीज गार्डन तयार केल्याने त्याचाही लाभ घ्यावा. मनापासून व्यायामाकडे लक्ष द्यावे असे आवाहन देखील नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल यांनी केले.येथील बालाजी महिला सेवा समिती तर्फे रविवारी दि. 19 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता “वॉकेथॉन” (पायी चालण्याचा उपक्रम) आयोजित करण्यात आला. या उपक्रमात शहरातील महिलांनी, अनेक महिला मंडळांच्या पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून या अभिनव उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद दिला.
आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी पायी चालण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पायी चालण्याचे महत्त्व विषद करण्यासाठी बालाजी महिला सेवा समितीच्या सर्व महिला पदाधिकारी यांनी स्तुत्य उपक्रम राबविला. शिरपूर येथील बालाजी महिला सेवा समिती मार्फत वर्षभर अनेक अभिनव उपक्रम राबविण्यात येतात. महिलांसाठी मार्गदर्शनपर तसेच महिलांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असे उपक्रम नियमितपणे सातत्याने राबविण्यात येतात. शिरपूर येथे रविवारी दि. 19 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरपूर वरवाडे नगर परिषदे पासून महिलांचे “वॉकेथॉन” म्हणजेच पायी चालण्याचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शहरातील असंख्य महिलांनी पायी चालून आरोग्यासाठी उपयुक्त असल्याबद्दलचा संदेश सर्वत्र देण्याचा प्रयत्न केला.
शिरपूर वरवाडे नगर परिषदे पासून सोनवणे वकिलांच्या घराकडून “इव्हज् पार्क” (लेडीज गार्डन) पर्यंत पायी चालण्याचा हा उपक्रम पूर्ण करण्यात आला. लेडीज गार्डनमध्ये या उपक्रमाचा समारोप झाला.
रेशा पटेल यांनी प्रास्ताविकात योग व पायी चालण्याचे महत्त्व सांगितले. आभार तसनीम जलगाववाला यांनी मानले.
शहरातील सेवा हॉस्पिटलच्या डॉ. जयश्री निकम यांनी आरोग्यबाबत मार्गदर्शन करतांना सांगितले की, महिलांनी सुंदर दिसण्यापेक्षा आतून सुंदर असणे आवश्यक आहे. सुदृढ आरोग्य, निरोगी असावे. आवडेेेल तो कोणताही व्यायाम करावा. दररोज नियमित व्यायाम करा. योग करावा. आसने करा, सूर्य नमस्कार करावा. पायी चालावे, हा मोफत चांगला व्यायाम आहे.
जयश्रीबेन पटेल हस्ते महिलांना शिरपूर पीपल्स बँकेचे स्मार्ट कार्ड, डेबिट कार्ड वाटप यावेळी करण्यात आले. यामुळे किराणा माल खरेदी करतांना 10 हजार रुपये पर्यंत चा माल खरेदी करता येणार आहे.
या वॉकेथॉन प्रसंगी शहरातील नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, रिटा पटेल, माजी नगराध्यक्ष संगीता देवरे, तस्नीम जळगाववाला, शिल्पा अग्रवाल, डॉ. राठी, सीमा रंधे, कल्पना राजपूत, रंजना गुजर, छाया ईशी, रेखा सोनार, संगीता थोरात, अग्रवाल महिला मंडळ, सिंधी महिला मंडळ, ब्राह्मण माहिला मंडळ, बोहरी समाज महिला मंडळ, मराठा पाटील मंडळ, माहेश्वरी महिला मंडळ, जैन महिला मंडळ, सोनार समाज महिला मंडळ, संगिता थोरात यांचे महिला समाज मंडळ, जैन समाज दोन महिला मंडळे, समृद्धी महिला मंडळ, लायनेस क्लब महिला, आद्य गौड समाज, रंजना गुजर यांचे महिला मंडळ, एकता महिला मंडळ, आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलाच्या शिक्षिका, राजस्थानी महिला मंडळ, कलाल महिला मंडळ, राजपूत महिला मंडळ, शिंपी महिला मंडळ, जैन डेरावसी मंडळ तसेच अनेक महिला मंडळे, प्राचार्या, मुख्याध्यापिका, अनेक क्षेत्रातील महिला मान्यवर यात सहभागी झाले होते.विशेष बाब म्हणजे सर्व उपस्थित महिला भगिनी गुलाबी रंगाच्या ड्रेस कोड मध्ये होत्या.
Tags
news
