शिरपूर येथे डॉक्टर्स क्लब तर्फे गोल्डकॉन-2020 वार्षिक परिषद उत्साहात संपन्न
शिरपूर - शहरात चांगले डॉक्टर्स असून ते आरोग्य सेवा देखील चांगली देत आहेत. आजची मोठी गरज आरोग्य सेवा आहे. आजाराचे निदान अचूक करावे. काही औषधींचा शरीरावर दुष्परिणाम देखील होतो त्याबाबत सर्वांनी सावधगिरी बाळगावी. भारतीय माणसाचे सरासरी आयुष्यमान वाढण्यासाठी डॉक्टर्स ने व सर्वांनी प्रयत्न करावे. शिरपूर येथे लवकरच 300 बेडचे मोठ्या हॉस्पिटलची निर्मिती आपण करतोय. इंदिरा गांधी हॉस्पिटलचे विस्तारित दुसरे हॉस्पिटल निर्माण करत आहोत. स्पर्धेत गुणवत्ता महत्वाची आहे. शाळा, कॉलेज, शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता महत्त्वाची आहे. आपले शिरपूर शहरात सर्वांनी आरोग्याच्या दृष्टीने लक्ष घालावे. लहान शहरात देखील सर्वोत्तम कार्य प्रत्येक क्षेत्रात होऊ शकते. नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांनी घेतलेला वॉकेथॉन उपक्रम कौतुकास्पद आहे. सर्वांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे. डॉक्टर्स यांनी शहरात ठिकठिकाणी विविध आरोग्य शिबीरे घ्यावे. अनेक डॉक्टर्स यांनी मागील अनेक वर्षे शिरपूरची आरोग्य सेवा केली. त्यांना आज पुरस्कार देऊन गौरविण्यात आल्याने त्यांच्या कार्याचे आपण कौतुक केले. शिक्षण, क्रीडा व शिरपूर पॅटर्न मधून पाण्याचे महत्वपूर्ण काम केले. आपण वर्षभरात 30 हजार कोटी पाणी जमिनीत टाकण्याचे काम केले. गेल्या अनेक वर्षे पासून तालुक्यात 250 बंधारे पूर्ण केले, 5 हजार बोरवेल्स जीवंत केले. शहरातील नागरिकानी भूमिगत गटारी कनेक्शन जोडून घ्या. आरोग्याशी संबंधित कामे करून सर्वांनी समाजासाठी काहीतरी देणे लागतो म्हणून कार्य करावे. जनजागृती करावी. शहरात पाणी योजनेमुळे 5 माळ्यांवर विनामोटर पाणी पोहचत असल्याने विजेची देेेखील बचत होत आहे. शहरात आर. सी. पटेल संस्थेत कॅम्पस मध्ये असंख्य विद्यार्थी निवड झाली. क्रीडा क्षेत्रात देखील आपले शेकडो विद्यार्थी देशभरात राज्यभरात आपले नावलौकिक करत आहेत. सर्वांनी स्वच्छतेचे महत्त्व समजून घ्यावे तसेच डॉक्टर्स ने जनजागृती कार्यक्रम घ्यावेत असे आवाहन माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांनी केले.
शिरपूर येथील डॉक्टर्स क्लब तर्फे गोल्डकॉन-2020 वार्षिक परिषद आर. सी. पटेल संस्थेतील एस. एम. पटेल ऑडिटोरियम हॉलमध्ये रविवारी दि. 19 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली.
व्यासपीठावर माजी मंत्री अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, तहसीलदार आबा महाजन, माजी उपनगराध्यक्ष सुरेश बागुल, नाशिक येथील पायोनियर हॉस्पिटलचे डॉ. सुरेश सुर्यवंशी, डॉ. विकास राजपूत, डॉ. सुनील ईशी, अनेक मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. सर्व उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक शिरपूर डॉक्टर क्लबचे अध्यक्ष डॉ. सुनील ईशी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. श्रीमती चंदन भंडारी, डॉ. श्रेयस भंडारी यांनी केले. आभार डॉ. अनिल पाटील यांनी मानले.
या वर्षापासून सुरू करण्यात आलेले जीवन गौरव पुरस्काराने डॉ. दुर्गादास वैद्य, डॉ. रमेश ओसवाल, डॉ. जयवंत जैन, डॉ. विश्वासराव पाटील यांना सन्मानित करण्यात आले. तसेच डॉक्टर क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास शहरातील व तालुक्यातील अनेक नामांकित डॉक्टर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शिरपूर डॉक्टर्स क्लबचे अध्यक्ष डॉ. सुनील ईशी, उपाध्यक्ष डॉ. मनोज निकम, उपाध्यक्ष डॉ. दीपक बागुल, सचिव डॉ. अनिल पाटील, डॉ. आशिष अग्रवाल, डॉ. प्रविण महाजन, डॉ. गुंजन पाटील, डॉ. सचिन पाटील, डॉ. लोकेश वैद्य, डॉ. श्रेयस भंडारी, डॉ. दिपक गिरासे, डॉ. पंकज पाटील, डॉ. विशाल पाटील, डॉ. जया जाने, डॉ. शीतल राका, डॉ. अर्चना महाजन, सर्व सदस्य यांनी प्रयत्न केले.
यावेळी नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल म्हणाल्या, डॉक्टर्स चे काम ईश्वरीय कार्य आहे. सर्व स्वस्थ राहिले तर शहर व तालुक्याचे आरोग्य स्वस्थ राहील. यासाठी वॉकेथॉन, पायी चालणे हा चांगला उपक्रम आहे. नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी डॉक्टर्स क्लबने विविध शिबिरांमधून आरोग्य सेवा बजावण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन देखील जयश्री पाटील यांनी केले.
तहसीलदार आबा महाजन म्हणाले, शिरपूर पॅटर्न चे जनक अमरिशभाई पटेल यांनी शिरपूर चे नाव देशभरात केले आहे.
शिरपूर गोल्डकॉन परिषदेत डॉ. ललित लवनकर, डॉ. कुणाल देसाई, डॉ. सुरेश सूर्यवंशी, डॉ. पल्लवी राजपूत, डॉ. कपिल पाटील, डॉ. जितेंद्र चौधरी यांनी विविध विषयांवर व्याख्यान दिले.
