शिरपूर - दि शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचालित आदर्श नगर येथील आर. सी. पटेल इंग्लिश मीडियम प्री-प्रायमरी स्कूल ने मुख्याध्यापिका ज्यूली थॉमस यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा महोत्सव साजरा करण्यात आला.यासाठी समुद्र ह्या विषयाला धरून कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यात नर्सरी च्या विद्यर्थ्यांनी नृत्य सादर केले. सिनिअर केजी च्या विद्यार्थांनी समुद्र, समुद्रातील प्राणी, समुद्रातील वाहने आणि सामुद्रिक जीवन ह्या सारखे निरनिराळे प्रकार नृत्यातून दाखविले.नगराध्यक्ष सौ. जयश्रीबेन पटेल यांच्या हस्ते तसेच अनेक मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन आणि मशाल पेटवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात 700 विद्यार्थांचा सहभाग होता.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, राजगोपाल भंडारी, योगेश भंडारी, फिरोज काजी, जाकीर शेख, संगीता देवरे, संस्थेचे सीईओ उमेश शर्मा, सोनवणे अलपेश, युवराज पवार, तुकाराम गवळी, स्वाती गुजराथी, प्राचार्य दिनेश राणा, रवी बेलाडकर, ज्युली थॉमस, निश्चल नायर, रिबेका नेल्सन, स्मिता पंचभाई, डॉ. वैशाली पाटील, एलिझाबेथ जानवे, किशोर माळी, सी. डी. पाटील, महेंद्र परदेशी आदींची उपस्थिती होती.ह्या कार्यक्रमात प्रत्येक वर्गातून तिन विजयी विद्यार्थी निवडण्यात आले. पालकांसाठी देखील स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात देखील विजयी पालकांना मेडल देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री खरे, पल्लवी देसले, प्रिया शर्मा, कांचन पवार यांनी केले. आभार प्रशंसा पाठक यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापिका ज्यूली थॉमस, शिक्षिका मनीषा पाटील, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
Tags
news
