शिरपूर : (प्रतिनिधी) - धर्मांतरासाठी होत असलेल्या जागेचा वापर बंद करणेबाबत निवेदन शिरपूर येथील विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कार्यकर्त्यांनी शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनास दिले .
शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दर रविवारी ख्रिश्चन धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी व नंतर या हिंदु लोकांना ख्रिश्चन धर्मामध्ये घेण्यासाठी प्रवचनाचे आयोजन केले जाते. या प्रवचनात जमलेल्या गरीब व आदिवासी बांधवांना ख्रिश्चन धर्मा विषयीचे महत्व पटवले जाते. त्याच बरोबर त्यांना कपडे, औषध ,जेवण इ.गोष्टीचे अमिष दिले जाते. हिंदु धर्मातील देव कसे तुमच्या हिताचे नाहित व फक्त येशु ख्रिस्त हाच तुम्हाला तुमच्या दुःखतुन तारु शकतो याचे महत्व पटवून दिले जाते. त्यांना खिश्चन धर्मात समाविष्ट होण्यासाठी प्रवृत्त केले जाते .याचा परिणाम म्हणुन अनेक यांच्या आमिषाला बळी पडून खिश्चन धर्मात बेसावधपणे ओढले जातात.सदर बाब हिंदु धर्माचा दृष्टीने घातक आहे. त्याच्या बद्दल जनसामान्यांच्या मनात प्रचंड प्रक्षोभ आहे. अश्या आशयाचे निवेदन कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनास देण्यात आले. निवेदनावर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कार्यकर्ते लक्ष्मीकांत जोशी, हेमराज राजपूत, वैभव भोंगे, मनीष धाकड , अजय शुक्ल , शशिकांत चौधरी, नयन माळी , नंदकुमार चौधरी, गोपाल मारवाडी, हेमंत पाठक , सागर पाटील , अमोल लोणारी, अतुल सोनार, श्रीनाथ शिंदे, आदी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
Tags
news
