धुळे, दि. 21 (जिमाका वृत्तसेवा) : शेतकरी आत्महत्या निर्मूलन व सहाय्यता समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत एकूण आठ प्रस्ताव पात्र ठरले, तर एका प्रस्तावाची फेरचौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
जिल्हाधिकारी गंगाथरन डी. अध्यक्षस्थानी होते. आमदार मंजुळाताई गावित, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, अशासकीय सदस्य जे. यू. ठाकरे, डॉ. धनंजय नेवाडकर, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), तहसीलदार साहेबराव सोनवणे (शिंदखेडा), किशोर कदम (धुळे ग्रामीण), प्रवीण चव्हाणके (साक्री), श्री. थवील (पिंपळनेर), सुदाम महाजन (दोंडाईचा) यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत एकूण 20 प्रस्ताव मांडण्यात आले होते. त्यापैकी आठ प्रस्ताव मंजूर झाले. अकरा प्रस्ताव अपात्र ठरले. एक प्रस्ताव फेरचौकशीसाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. मंजूर प्रस्ताव असे : धुळे ग्रामीण- 3, साक्री-2, शिंदखेडा- 1, धुळे शहर- 1, दोंडाईचा- 1.
Tags
news