विजेची समस्या लवकर सोडवा राहुल रंधे



बोराडी - परिसरातील सलईपाडा,चिंचपाणी,नवाधाबापाडा,तिखीबर्डी,वाहण्यापाणी,जामनपाणी या दुर्गम आदिवासी भागातील विजेच्या समस्यांनी त्रस्त नागरिकांनी शिरपूर तालुका भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल रंधे यांच्यासह बोराडी येथील उपवीज कार्यालयात कैफियत मांडली.राहुल रंधे यांनी संबंधित अधिकारींना सांगितले की,या पैकी काही गावांमध्ये विजेचे रोहित्र नादुरुस्त आहे.तर काही ठिकाणी विजेची अनियमिता व भारनियमन जास्त असल्याने शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचे खुप हाल होत आहेत.पिकांना वेळेवर पाणी न मिळाल्याने पिके करपून जात आहेत. आधीच अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे.व आता पाणी नसल्याने पिक हातातून जाण्याची शक्यता आहे.वीज वेळेवर येत नसल्याने पिकांना पाणी मिळत नाही व शेतकरी डोळ्यासमोर पिक जात आहे म्हणून अतिशय त्रस्त झाले आहेत.म्हणून संबंधित अधिकारींनी फीडर,रोहित्रसंबधीत ताबडतोब उपाययोजना करण्याची सुचना दिली.यावेळी उपअभियंता नेमाळे,सैंदाणे उपस्थित होते.तर शशांक रंधे,भाजपाचे आदिवासी आघाडीचे उपाध्यक्ष भरत पावरा, परीसरातील तुकाराम पावरा,सुतारा पावरा,जगदीश पावरा,विसन पावरा,मावा पावरा,खुमसिंग पावरा,गिरमा पावरा,केरसिंग पावरा,चुनीराम पावरा,प्रधान पावरा,राजल पावरा,नवलसिंग पावरा,सुक्राम पावरा, वेचा पावरा,शिवाजी पावरा,रजान पावरा,पंडीत पावरा,कृष्णा पावरा,डायला पावरा,शालीक पाटील,भरत गुजर,भागवत पवार,संजय पाटील,इ.उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने