*शिरपुर (प्रतिनिधी)* :- नवनिर्वाचित जि. प. अध्यक्ष डाॅ. तुषार रंधे यांचे सावळदे ता. शिरपूर येथे आगमन झाल्यावर जंगी सत्कार करण्यात आला. तापी नदी आेलांडल्यावर सावळदे हे शिरपूर तालुक्यातील पहिले गाव आहे. म्हणून *आज डाॅ. तुषार रंधे यांचा तालुक्यातील पहिला सत्कार सावळदे गावाच्या वतीने करण्यात आला. यावेळी सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयाेजक *सावळदे येथील हाॅटेल गॅलक्सीचे संचालक तर तालुक्यातील भाजपाचे कट्टर समर्थक अतुल राजपूत व सचिन राजपूत या बंधु द्वयींनी जंगी सत्कारासह जे. सी. बी. मशीनच्या सहाय्याने गुलालाची उधळण केली*. तर ढाेल ताश्यांच्या गगनभेदी आवाज व फटाक्यांच्या आतिषबाजीने वातावरण दणाणून साेडले. तालुक्याला जि. प.अध्यक्ष पद मिळाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण हाेते. परिसरातील कार्यकर्ते सत्कारासाठी उत्सुक असल्याने सावळदे येथे प्रचंड जनसमुदाय जमला होता डाॅ. रंधे यांनी देखील कार्यकर्ते यांना वेळ दिला. तर तालुक्याच्या वतीने पहिला गुलाल टाकण्याचा मान सावळदे करांना गेला.
यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष बबन चाैधरी, तालुका अध्यक्ष राहुल रंधे, राेहित रंधे, निशांत रंधे, जितु राजपूत,सावकार पाटील, भिका जमादार,पप्पु पाटील, प. स. सदस्य विजय खैरनार, श्रध्दा इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक प्रदिप राजपूत, पिंप्री चे माजी सरपंच संजय धनगर, जयपाल गिरासे, राजकिरण राजपूत, रविंद्र राजपूत, रितेश राजपूत, भिका काेळी, साेमेश राजपूत, आदी तर सावळदे येथील वासुदेव महाजन, धर्मेंद्र राजपूत, महेंद्र राजपूत, गाेकुळसिंग राजपूत, एकनाथ राजपूत, परेश दाेरीक, हुकूमचंद राजपूत, पदमसिंग राजपूत, शामसिंग राजपूत, सावळदे सरपंच सुदाम साेनवणे, चुनीलाल जगदेव, राजु भिल, प्रकाश भाेई, गेंदा भिल, सुनिल भिल, नामदेव पवार, भटेसिंग राजपूत, गजेंद्र राजपूत, आशिष राजपूत, रणविर राजपूत,श्रीपाल राजपूत,बापु काेळी, दिलीप काेळी, बाळू काेळी आदी उपस्थित हाेते. यावेळी डाॅ. तुषार रंधे तालुका अध्यक्ष राहुल रंधे यांनी पंचक्रोशीतील मतदार बांधवांचे आभार मानले. सावळदे, कुरखळी, पिंप्री, आढे येथील युवा कार्यकर्ते माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ व नवयुवक मित्र मंडळ सावळदे यांनी परिश्रम घेतले.
Tags
news
