दोंडाईचा- पोलीस स्टेशन व उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानाने शहरातील नंदुरबार चौफुली येथे "आरोग्य तपासणी शिबीर" घेण्यात आले.
या प्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, डॉ. ललितकुमार चंद्रे, दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक श्री. देविदास पाटील तसेच योगेश पवार, सुरेश सदाराव, धीरज डोडे, अजय माळी, हेमंत पाटील तसेच सर्व पोलीस कर्मचारी यांनी सहभाग घेतला. या शिबिरात एकूण १३३ वाहन चालकांची मोफत तपासणी करण्यात आली. यात रक्तदाब, रक्तशर्करा, एड्स, सिकल सेल यांची मोफत तपासणी करण्यात आली. मोफत निरोध वाटप करण्यात आले. तसेच डॉ. ललितकुमार चंद्रे, यांनी सर्वांना, असुरक्षित लैंगिक संबंध मुळे एड्स कसा होतो, या बद्दल थोडक्यात पण महत्वाचे मार्गदर्शन केले. तसेच दारू पिऊन गाडी चालवणे अत्यंत धोकेदायक असून त्यामुळे अपघात होऊन जीव जाऊ शकतो असे सुचवले. सर्वांनी आपल्याला आरोग्याची काळजी घेण्याचे विनम्र अभिवादन, डॉ. चंद्रे यांनी केले. तसेच पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील यांनी सर्वांना रहदारीच्या नियमाबद्दल मार्गदर्शन केले. तर उपनिरीक्षक श्री. देविदास पाटील यांनी नशा करून गाडी चालवताना पकडले गेल्यास कायद्यानुसार कठोर कारवाई होऊ शकते असे बजावले. रस्ते सुरक्षा अभियान सप्ताह निमित्ताने येत्या १७ तारखेला शुक्रवारी पोलीस स्टेशन दोंडाईचा येथे "भव्य रक्तदान शिबीर" आयोजित करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करा व जीवदान देण्यास मदत करा असेही शेवटी नमूद केले..
Tags
news
