शिरपूर - येथील आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयात दि. ११ जानेवारी रोजी माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. जे. सुराणा होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ. अतुल शिरखेडकर, माजी विद्यार्थी असोसिएशन चे प्रमुख प्रा. डॉ. नितीन हसवानी, इनचार्ज प्रा. डॉ. प्रीतम जैन, प्राध्यापक वृंद उपस्थित होते. हा भव्य मेळावा महाविद्यालयातील ऑडिटोरिअम हॉल मध्ये संपन्न झाला.
महाविद्यालयाची सुरुवात १९९२ साली झाली असून १९९६ ला बी.फार्मसी ची पदवी हस्तगत केलेले व त्या नंतर शैक्षणिक वर्षातून उत्तीर्ण तत्कालीन विद्यार्थी जे आता आप आपल्या क्षेत्रात मोठ्या हुद्द्यांवर कार्यरत आहेत, ते माजी विद्यार्थी या मेळाव्यात सहभागी झालेले होते.
उपप्राचार्य डॉ. अतुल शिरखेडकर यांनी प्रास्ताविकात माजी विद्यार्थी असोसिएशन बद्दल माहिती दिली. असोसिएशन चे उद्दिष्टे, स्वरूप व धोरणे स्पष्ट केली. प्राचार्य डॉ. संजय सुराणा यांनी फार्मसी महाविद्यालयाचा गेल्या २७ वर्षातील प्रगतीचा आढावा स्पष्ट केला. २७ वर्षापूर्वी माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांनी सुरु केलेले हे महाविद्यालय शिक्षण आणि संशोधनात उच्च स्थानावर पोहचले असून येथील विद्यार्थी भारतातातच नव्हे तर परदेशात नावलौकिक करत आहे असे नमूद केले. तसेच या मध्ये आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक विद्यार्थीभिमुख शिक्षण पद्धती, शिस्त, प्राध्यापकां द्वारे आई. सी. टी. बेस्ड लर्निंग याचा उल्लेख केला. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी मुळे शिरपूर आणि आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयाची ओळख संपूर्ण फार्मसी क्षेत्रात वाढत आहे. बऱ्याच बहुराष्ट्रीय फार्मा इंडस्ट्रीज मध्ये माजी विद्यार्थी बहू संख्येने कार्यरत आहे असे नमूद केले.
महाविद्यालयाचे अनेक काही माजी विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षण घेत आहेत. या कार्यक्रमात १०० हुन अधिक माजी विद्यार्थांनी सहभाग नोंदविला. आपली मनोगत व्यक्त केली. दुपारच्या सत्र मध्ये स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले. सूत्र संचालन डॉ. सौरभ गणोरकर यांनी केले. आभार प्रा. स्नेहल भावसार यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी इनचार्ज प्रा. डॉ. प्रीतम जैन, डॉ. आशिष गोरले, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख डॉ. मनोज गिरासे यांनी मेहनत घेतली.
माजी विद्यार्थी समारंभ बदल संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, नगरसेवक तपनभाई पटेल, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. जे. सुराणा, उपप्राचार्य डॉ. अतुल शिरखेडकर यांनी समाधान व्यक्त केले.
Tags
news
