अमरिशभाई पटेल सीबीएसई स्कूलचा विद्यार्थी विवेक माळी याची पंतप्रधान मोदीं सोबत 'परिक्षा पे चर्चा' कार्यक्रमासाठी झाली निवड, प्रतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत प्रत्यक्ष होणार सुसंवाद.


शिरपूर – दि शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित अमरिशभाई आर. पटेल सीबीएसई स्कूल मधील दहावीचा विद्यार्थी विवेक अविनाश माळी याची 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमासाठी निवड झाली असून त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्याशी प्रत्यक्ष सुसंवाद साधण्याची संधी प्राप्त झाली आहे. विद्यालयासाठी व शिरपूर तालुक्यासाठी गौरवास्पद बाब आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मोजक्याच विद्यार्थ्यांची निवड या कार्यक्रमासाठी झाली असून खान्देशातून फक्त या एकमेव विद्यार्थ्याची निवड झाली आहे.
परिक्षेविषयी बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात भीती असते. ही भीती दूर व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांसाठी 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रबोधन करीत आहेत. या वर्षीदेखील नवी दिल्ली येथे दि. २० जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधणार आहेत.
यासाठी विशेष ऑनलाईन स्पर्धा घेण्यात आली होती. या परीक्षेत विद्यार्थ्यांना दिलेल्या पाच विषयांवर आपले स्वतःचे मनोगत मांडायचे होते व प्रश्न विचारायचा होता. त्या प्रश्नाचे महत्व लक्षात घेऊन ही निवड होते.
या स्पर्धेत विवेक अविनाश माळी याची निवड झाली आहे. त्याच्या  या यशाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे. त्यास शाळेचे प्राचार्य निश्चल नायर, विषय शिक्षक निलेश चोपडे, महेश पिसू, वाहिद शेख यांचे मार्गदर्शन लाभले. दि. १७ जानेवारी रोजी विवेक माळी हा निलेश चोपडे यांच्यासह नवी दिल्ली येथे रवाना होणार आहे.
त्याच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, संस्थेचे कार्याध्यक्ष भुपेशभाई पटेल, उद्योगपती तपनभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, सीईओ डॉ. उमेश शर्मा, शिक्षण विस्तार अधिकारी साळुंखे, प्राचार्य निश्चल नायर, प्राचार्य दिनेश राणा, केंद्रप्रमुख बाविस्कर, उपप्रचार्या सौ. अनिता थॉमस यांनी कौतुक केले. तसेच सर्वांनी पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने