शिरपूर आय.एम.आर.डी. परिसंस्थेच्या 25 विद्यार्थ्यांची “इन्फोसिस” कंपनीमध्ये कॅम्पस मुलाखतीत स्तुत्य निवड




शिरपूर - येथील आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्ट संचालित आय.एम.आर.डी. शिरपूर परिसंस्थेतील 25 विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या भारतातील अग्रनामांकीत “इन्फोसिस” कंपनीमध्ये निवड झाली. त्यांची 1.60 लाख रुपये या वेतनश्रेणीवर बिझनेस प्रोसेस एक्झीकेटीव या पदासाठी निवड झाली अशी माहिती आय.एम.आर.डी. संचालिका डॅा. वैशाली पाटील यांनी दिली.
आय.एम.आर.डी. परिसंस्थेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग व इन्फोसिस कंपनीच्या सहाय्याने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव कार्यक्षेत्रातील  कला, वाणिज्य व व्यवस्थापन महाविदयालयातील बी.बी.ए., बी.बी.एम., बी.एम.एस., बी.कॉम. व बी.ए. च्या अंतिम वर्षातील विदयार्थ्यांसाठी कॅम्पस प्लेसमेंटचे आयोजन करण्यात आले होते.
यात प्राथमिक निवड चाचणीसाठी खान्देशातील विविध महाविद्यालयातील 200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. संपूर्ण निवड प्रक्रिया परिसंस्थेच्या इमारतीत झाली. कॅम्पस इंटरव्ह्यूच्या प्रक्रियेत इन्फोसिस कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चमूने सहभाग घेतला. तीन स्त्‍रावर झालेल्या या निवड प्रक्रियेत निबंध लेखन, बुध्दीमत्ता चाचणी, टेलिफोनीक मुलाखत व एच.आर. राऊंड घेण्यात आला. 42 विदयार्थ्यांची मुलाखत चाचणी प्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. यातून एकूण 30 विदयार्थ्यांची बिझनेस प्रोसेस एक्झीकेटीव पदासाठी निवड झाली. त्यात आर.सी.पटेल एज्युकेशनल ट्रस्ट संचलित आय.एम.आर.डी. शिरपूर परिसंस्थेतील सुमारे 25 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
गेल्या महिन्याभरापासून परिसंस्थेत विद्यार्थ्यांची ॲप्टीट्युड टेस्ट, निबंधलेखन व मौखिक मुलाख़त यांचा सराव सुरु होता.
या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये बी.बी.ए. अंतिम वर्षातील शिवानी मालवीय, राहुल मांडे, दिव्यम अग्रवाल, उमंग जोशी, गुंजन राहेजा, उन्नती चौधरी, योगेश वाघ, शादब शेख, युक्ता पाटील, तुषार पाटील, प्राची पाटील, महिमा तयाल, गौरव चांदवानी यांची तसेच बी.एम.एस. अंतिम वर्षातील उर्मिला निकुंभ, रश्मी जेठालिया, लिना अग्रवाल, अमित पाटील, राहुल मोरे, मधू राय, भूषण सोलंकी, पायल पाटील, कमलेश अग्रवाल, कुलदीप राठोड, रुपेश रत्नपारखी, अभिषेक बोरसे या विद्यार्थ्यांची 1.60 लाख रुपये या वेतन श्रेणीवर बिझनेस प्रोसेस एक्झीकेटीव या पदासाठी निवड झाली.
तर इन्फोसिस कंपनीतर्फे ए. पी. शाह इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी मुंबई येथे आयोजित कॅम्पस प्लेसमेंटमध्ये बी.सी.ए. अंतिम वर्षातील स्नेहल सुरेश माळी या विद्यार्थिनीची 2.20 लाख रुपये या वेतन श्रेणिवर ऑपरेशन एक्झीकेटीव या पदासाठी निवड झाली.
परिसंस्थेतून पदवी प्राप्त केलेले 50 पेक्षा जास्त विद्यार्थी सदर कंपनीत विविध पदांवर कार्यरत आहेत.
कॅम्पस यशस्वितेसाठी ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. अर्चना जडे, प्रा. दिनेश बोरसे, प्रा. सचिन सुराणा, प्रा. अमर गौर, प्रा.अमुल तांबोळी, प्रा. लक्ष्मीकांत शर्मा प्रा. बागवान सुफियान यांनी परिश्रम घेतले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्ट चे अध्यक्ष भुपेशभाई पटेल, उपाध्यक्ष तपनभाई पटेल, संस्थेचे चेअरमन राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, शिरपूर पिपल्स बँकेचे चेअरमन योगेश भंडारी, माजी कुलगुरु डॉ. के.बी.पाटील, परिसंस्थेच्या संचालिका डॉ. वैशाली पाटील, एम.सी.ए. विभागप्रमुख प्रा.मनोज बेहेरे, एम.एम.एस. विभाग़प्रमुख डॉ. मनोज पटेल, पदवी विभागप्रमुख प्रा. तुषार पटेल यांनी कौतुक केले. 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने