“वॉकेथॉन” मार्फत शिरपूरकर महिला पायी चालत देतील सुदृढ आरोग्याचा सल्ला....... सुदृढ आरोग्यासाठी शिरपूर येथे बालाजी महिला सेवा समिती तर्फे रविवारी “वॉकेथॉन” या पायी चालण्याच्या उपक्रमाचे आयोजन.



शिरपूर येथील बालाजी महिला सेवा समिती तर्फे रविवारी दि.१९ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता “वॉकेथॉन” हा पायी चालण्याचा उपक्रम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.जयश्रीबेन पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होवून स्वत:सह इतरांना देखील सुदृढ आरोग्याचा सल्ला देण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन बालाजी महिला सेवा समितीच्या पदाधिकारी यांनी केले आहे.
आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी पायी चालण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पायी चालण्याचे महत्त्व विकसित करण्यासाठी बालाजी महिला सेवा समितीच्या सर्व महिला पदाधिकारी यांनी स्तुत्य उपक्रम राबविला आहे. यात शहरातील अनेक समाजाची महिला मंडळे देखील सहभागी होणार आहेत.

शिरपूर येथील बालाजी महिला सेवा समिती मार्फत वर्षभर अनेक अभिनव उपक्रम राबविण्यात येतात. महिलांसाठी मार्गदर्शनपर तसेच महिलांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असे उपक्रम नियमितपणे सातत्याने राबविण्यात येतात.
“वॉकेथॉन”अंतर्गत शहरातील असंख्य महिला पायी चालून आरोग्यासाठी उपयुक्त असल्याबद्दलचा संदेश सर्वत्र देतील.

असा असणार मार्ग :-
नगर पालिके पासून सोनवणे वकिलांच्या घराकडून “इव्हज् पार्क” (लेडीज गार्डन) पर्यंत पायी चालण्याचा हा उपक्रम पूर्ण होईल. लेडीज गार्डनमध्ये या उपक्रमाचा समारोप होणार आहे. शहरातील महिलांनी जास्तीत जास्त संख्येने या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असणाऱ्या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन बालाजी महिला सेवा समिती च्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने