मुकेशभाई आर. पटेल मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी "योद्धा" क्रीडा महोत्सवात सादर केले क्रीडा नैपुण्य,


शिरपूर- एस.व्ही.के.एम. संस्था मुंबई संचलित तांडे ता. शिरपूर येथील मुकेशभाई आर. पटेल मिलिटरी स्कूलच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी "योद्धा" हा वार्षिक क्रीडा महोत्सवात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात धमाल करत अनेक बक्षिसे संपादन केले.
क्रीडा महोत्सवाचे व बक्षीस वितरण सोहळ्याचे उद्घाटन श्री विले पार्ले केळवणी मंडळ अध्यक्ष माजी शिक्षणमंत्री अमरिशभाई यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे सह-अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी सौरभकुमार अग्रवाल (आय. पी. एस.), एअर रायफल शूटिंग राष्ट्रीय खेळाडू संजना जयस्वाल, मुंबई येथील गिरीजा मोहन यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात चोपडा येथील डी. वाय. एस. पी. सौरभकुमार अग्रवाल यांनी तसेच श्री विले पार्ले केळवणी मंडळ संस्थेचे सह-अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व शाळेच्या सर्व कर्मचारी यांचे कौतुक केले.
 यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सह-अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी सौरभकुमार अग्रवाल (आय. पी. एस.), एअर रायफल शूटिंग राष्ट्रीय खेळाडू संजना जयस्वाल, मुंबई येथील गिरीजा मोहन, श्री बालाजी संस्थान उपाध्यक्ष गोपाल भंडारी, शिरपूर पीपल्स बँक चेअरमन योगेश भंडारी,  होस्टेल कमिटी चेअरमन यशवंत बाविस्कर, शिरपूर मर्चंट बँक अध्यक्ष प्रसन्न जैन, जाकीर शेख, आर.सी.पटेल संस्थेचे सीईओ डॉ. उमेश शर्मा, श्रीमती मुखत शेरील, प्राचार्य दिनेशकुमार राणा, मुख्याध्यापक पी. सुभाष, रवि बेलाडकर, निश्चल नायर, सुनंदा मेनन, जपश्री मुखर्जी, रती नायर, श्रीमती प्रसन्नलता, संस्थेच्या विविध शाळांचे मुख्याध्यापक, अनेक मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित सर्व मान्यवर यांच्या हस्ते सुरुवातीस कै. मुकेशभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर खेळाडू व मान्यवर यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करण्यात आली. यावेळी 'योद्धा' क्रीडा महोत्सव-2019-20 चे हवेत फुगे सोडून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर शाळेतील सर्व खेळाडू, विद्यार्थी यांनी प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. खेळाडूंनी खेळाची प्रतिज्ञा घेतली.
भव्य अशा हिरवळीवर मैदानावर मोठ्या संख्येने खेळाडूंनी व बाल कलाकारांनी सादर केलेल्या खेळ व कार्यक्रमांना हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या पालकांनी तसेच प्रमुख पाहुण्यांनी मनापासुन दाद देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या प्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट संचलन केले. तसेच विद्यार्थ्यांनी 'कमांडो' पथकाचे प्रात्यक्षिके सुंदररित्या सादर केले. अनेक विद्यार्थ्यांनी कवायतींचे सादरीकरण केले. संगिताच्या तालावर विद्यार्थ्यांनी विविध खेळ व नृत्याविष्कार सादर केले. विविध नृत्य, विविध प्रात्यक्षिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे तसेच स्पोर्ट गीत यांचे सादरीकरण खुपच सुंदर झाले. विविध शर्यतींमध्ये खेळाडू यांनी धमाल केली. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आनंद लुटला व विविध क्रीडा नैपुण्य सादर केले.
विविध स्पर्धांमधील यशस्वी खेळाडूंना सर्व उपस्थित प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते स्मृतीचिन्हे, प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले.
मिलिटरी स्कूल प्राचार्य दिनेशकुमार राणा यांनी शाळेत वर्षभर राबवलेल्या विविध उपक्रमांबद्दल तसेच विद्यार्थी खेळाडूंनी संपादन केलेल्या प्रगतीबद्दल सविस्तरपणे अहवाल सादर केला. कार्यक्रमास सर्व विद्यार्थी, पालक, विविध संस्थांचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक, सर्व शिक्षक, प्रशिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने