संशोधनातून जागतिक व्यासपीठावर झेप — क्रीडा संचालक डॉ. एल. के. प्रताळे यांची जागतिक क्रीडा परिषदेसाठी निवड
*"बॉक्सिंग प्रशिक्षणात विज्ञान, तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभाव: एक विश्लेषणात्मक अभ्यास”* या संशोधनावर आधारित निवड; एस.पी.डी.एम. महाविद्यालयाचा अभिमान वाढवणारी कामगिरी.
एस.पी.डी.एम. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. एल. के. प्रताळे यांची प्रतिष्ठित जागतिक क्रीडा परिषदेसाठी (World Sports Conference Colombo, Srilanka) निवड झाली असून, ही परिषद 6 ते 9 नोव्हेंबर 2025 दरम्यान कोलंबो (श्रीलंका) येथे पार पडणार आहे.
डॉ. प्रताळे यांनी सादर केलेला “बॉक्सिंग प्रशिक्षणात विज्ञान, तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभाव: एक विश्लेषणात्मक अभ्यास” हा संशोधन विषय परिषदेसाठी मान्य करण्यात आला आहे. या विषयावर त्यांच्या नाविन्यपूर्ण अभ्यासाला जागतिक स्तरावर मान्यता मिळाल्याने महाविद्यालयासह परिसरात आनंदाचे वातावरण आहे.ही निवड त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधनवृत्तीचे फलित असून, या माध्यमातून शिरपूर सारख्या शहराला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळणार आहे.यापूर्वीही डॉ. प्रताळे यांनी जपान, मॉरिशस, सिंगापूर, दुबई, व्हिएतनाम, मलेशिया, बँकॉक आणि दक्षिण कोरिया अशा अनेक देशांमध्ये जाऊन आपले संशोधन व शैक्षणिक कार्य यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. त्यांचे हे सातत्यपूर्ण आंतरराष्ट्रीय योगदान त्यांना अधिक व्यापक ओळख आणि जागतिक प्रतिष्ठा मिळवून देणारे ठरले आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. राजपूत यांनी सांगितले,
> “डॉ. प्रताळे यांची निवड ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या संशोधनातून क्रीडा क्षेत्रात नवा दृष्टिकोन निर्माण होईल. या यशामुळे एस.पी.डी.एम. महाविद्यालय आणि किसान विद्या प्रसारक संस्थेचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकणार आहे.”
सदर निवडीबद्दल किसान विद्या प्रसारक संस्था अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, सचिव श्री. निशांत रंधे, खजिनदार सौ. आशाताई रंधे, विश्वस्त श्री. रोहितभाऊ रंधे, माजी प्राचार्य व विश्वस्त डॉ. एस. एन. पटेल,प्राचार्य डॉ. एस. एस. राजपूत, उपप्राचार्य डॉ.दिनेश भक्कड,डॉ.आबासाहेब देशमुख, तसेच सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी डॉ. प्रताळे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या यशामुळे एस.पी.डी.एम. महाविद्यालयाने पुन्हा एकदा संशोधन व क्रीडा क्षेत्रात जागतिक ओळख प्रस्थापित केली आहे.
