**स्टॅच्यू ऑफ विश्वविधाता येथे भव्य दिव्य प्रभु विश्वकर्मा मंदिर होणार**
प्रतिनिधी (मुस्तफा शाह.) धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात खर्दे शिवारात भव्य दिव्य प्रभु विश्वकर्मा मंदिर चे भुमीपूजन मंत्री मोहदयांसह,संत महांतांच्या उपस्थितीत होणार आहे. याठिकाणी प्रभु विश्वकमांचा ५५१ फुट पुतळा उभारुन विश्वविक्रम ठरणारआहे. . प्रभु विश्वकर्मांचे सुमारे २५०० चौरस फुट मंदिर असून, मंदिराची उंची ही सुमारे ५५ फुट राहील. या या वास्तुचे शिल्पकार राजू नागरगाेजे नांदेड येथील असून यांनी नुक्तीच प्रभु विश्वकर्मा मंदिराची जागा पाहाणी केली असुन. बांधकामाचा करार ही करण्यात आला आहे. त्यामुळे हे शिल्प लवकरच पूर्ण हाेईल असे अयोजाकांनी सांगीतले. स्टॅच्यू ऑफ विश्वविधाता हे पर्याटक स्थळ म्हणून ओळखले जाईल. जागी प्रभु विश्वकर्मा मंदिरासह राम मंदिर, महादेव मंदिर, खाटूशाम मंदिर, विठ्ठल रुख्मणी मंदिर, कानुबाई मातेचे मंदिर, हे महत्वाचे आकर्षण ठरणार आहे. ५५१ फुटाचा प्रभु विश्वकर्माचा पुतळ पर्याटकांचे लक्ष वेधून घेणार आहे. त्याच बरोबर याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक ही पर्याटकांचे साठी आकर्षण ठरणार आहे.त्याच बराेबर
भव्य दिव्य गार्डन व भक्ती निवासी सूविधा उपलब्ध राहणार आहे. संस्थेचे हॅलीपॅड देखील येथे उपलब्ध आहे. सुमारे सात वर्षात हा प्रकल्प उभारण्यासाठी 7वर्ष लागतील. या साठी युध्द पातळीवर काम सुरु आहे. कामाची सुरुवात म्हणून प्रथम विश्वकर्मा मंदिर उभारुन विश्वविक्रमाकडे वाटचाल संघटना करीत आहे. असे एका माहिती पत्रकात प्रसिध्द करण्यात आले आहे. फोटो कॅप्शन। १) छायाचित्रात मंदिराचे शिल्पकार राजू नागरगोजे
स्टॅच्यू ऑफ विश्वविधाताचे मंगेशकुमार हिरे, सदाशिव मिस्तरी, विजय सोनवणे, योगेश माळी, विजय पाटील व इतर जागेची पहाणी करतांना २.) छायाचित्रात मंदिराचे शिल्पकार राजू नागरगोजे यांचा सन्मान करतांना स्टॅच्यू ऑफ विश्वविधाताचे मंगेशकुमार हिरे, सदाशिव मिस्तरी, विजय सोनवणे, योगेश माळी इ. ३.)छायाचित्रात प्रभु विश्वकर्मा यांचे भव्य दिव्य मंदिर।
४.) छायाचित्रात मंदिराचे शिल्पकार राजू नागरगोजे व स्टॅच्यू ऑफ विश्वविधाताचे मंगेशकुमार हिरे, सदाशिव मिस्तरी, विजय सोनवणे, योगेश माळी इ. नियोजित प्रभु विश्वकर्मा मंदिराचे छायाचित्र प्रकाशन करतांना। *
