आमचा लढाशेतकऱ्यांच्या हक्कासाठी , प्रसिद्धीसाठी नाही – किसान सभेचा थेट निशाणा”

 



आमचा लढाशेतकऱ्यांच्या हक्कासाठी , प्रसिद्धीसाठी नाही – किसान सभेचा थेट निशाणा”


शिरपूर तालुक्यात  शेतकऱ्यांचे हित जरी पूर्णपणे साकारले जात नसले तरी शेतकऱ्यांच्या कैवारी म्हणून घेण्याची राजकीय चढाओढ मात्र जोमत सुरू आहे.


शिरपूर फर्स्ट या संघटनेचे काही युवकांनी आपल्या समविचारी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने व शेतकऱ्याचे समर्थन घेऊन शिरपूर शहरात शेतकरी एल्गार मोर्चाचे आयोजन केले होते. यास भारतीय किसान सभेने देखील पाठिंबा दिला होता आणि स्थानिक आमदार यांच्यावर शेतकरी विरोधी असल्याची टीका केली होती.


त्यास प्रतिउत्तर म्हणून आमदार यांनी देखील या मोर्चाला आमचा देखील पाठिंबा असून शिरपूर तालुक्याला लाभ मिळावा म्हणून प्रयत्न सुरू असल्याचा खुलासा केला. आणि आमदार झोपले आहेत का? त्यांच्या वरील या टीकेला उत्तर देत विरोधक केवळ प्रसिद्धीसाठी आरोप करत असल्याचा  आरोप केला.


या वर आता किसान सभेच्या ॲड. हिरालाल परदेशी यांनी देखील एक पत्रक काढून उत्तर दिले आहे.


यात नमूद करण्यात आले आहे की,


माझ्या बोलण्यामुळे कमीतकमी आमदार साहेबांना त्याची बाजू तरी मांडावी लागली व शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामाची यादी प्रसिद्ध केली हिच अपेक्षा आम्हा शेतकऱ्यांना हवी आहे. 


सदरचा मोर्चा शिरपूर फस्ट चा तरुणांनी आयोजित केलेला होता.तमाम तालुक्यातील शेतकऱ्यांनी या मोर्चात फक्त नी फक्त शिरपूर तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टीचा यादीत समाविष्ट करण्यात यावे व संपूर्ण कर्जमाफी व्हावी या रास्त मागण्या असल्याने सर्वांनी आमदार व लोक प्रतिनिधींनी सामिल होणे अपेक्षित होते. आमदार समोर तर आलेच नाहीत.या उलट कोण कोण मोर्चात आले आणि कोण काय बोलले या वर पाळत ठेवण्यात आली.


परंतु आमदार काशीरामदादा आपल्या खुलाश्यात म्हणतात कि, सत्तेत नसणारे व राजकीय कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले यांचा अर्थ काय होतो. या तालुक्यात शेतकऱ्यांसाठी न्याय मागने गुन्हा आहे का? 



हि वस्तुस्थिती खरी आहे की,आपला तालुका सुजलाम सुफलाम आहे तो फक्त राजकीय लोकांसाठी. मात्र या तालुक्याचे महत्त्वाचे सहकारी प्रकल्प जसे साखर कारखाना, दूध संघ, खरेदी विक्री संघ, सूतगिरणी बंद असून काही फक्त नावाला सुरू आहेत. उषा बरी शेतकऱ्यांना कैरीचे पीक घ्यावे लागत आहे, मास्टर केळीचे भाव मातीमोल झाले आहेत. याची जबाबदारी कोणाची?


वन जमिनीचे ७/१२मिळवुन देण्यासाठी आमदार साहेबांनी प्रयत्न केलेत. असा दावा केला जातो मात्र महाराष्ट्र राज्य किसान सभेतर्फै व बिरसा आर्मी तर्फै वनजमिन कसणारे शेतकऱ्यांचा २६,२७,२८, फेब्रुवारी २०२२ला सांगवी ते धुळे पायी मोर्चा काढण्यात आला.


सदरचा पायी मोर्चा देखिल हजारो वनजमिन कसणारे आदिवासी शेतकरी ८०की.मी पायी जात असताना सांगवी ते शिरपूर हद्दीती साधी विचारपूस केली नाही.


रस्तायात पाणी देखिल पाजले नाही.सदर मोर्चा यशस्वी होऊ नये.म्हणुन सर्वते प्रयत्न करण्यात आले मोर्चास परवानगी नसताना आदिवासी बांधवांना न्याय मागण्यासाठी जेल मध्ये जाण्याची देखील तयारी किसान सभा व बिरसा आर्मी ने ठेवली,

पायी मोर्चा चौपदरी वरुन निघाल्यामुळे प्रशासन हादरले.


शिरपूर तालुक्याचा १२०००/वनजमिनचा फाईलंचा डाटा काढण्यात आला.कर्तव्यदक्ष मा.जलज शर्मा जिल्हाधिकारी साहेबानी संपूर्ण मोर्चा प्रत्यक्षात सोशल मिडिया न्युज लाइव्ह पाहून किसान सभा व बिरसा फायटर चे अभिनंदन केले.


रातोरात २/०८/२०१९ शासन परिपत्रक लाल फितितुन बाहेर काढून त्या परिपत्रकाचा आदेशान्वये जे फार्म चा जन्म झाला.आणी शिरपूर तालुक्यातील पाच आदिवासी बांधवांना जे फार्म ताब्यात घेतले व त्यांची जंगी विजयी मिरवणूक किसान सभेने सांगवी रेंज वरून काढली.त्यामुळे सांगवी रेंज चे गंभीरे मॅडम यांची तडकाफडकी बदली करण्यात आली.


या जे फार्म वाटप करून त्याचे पुर्ण श्रय घेण्याचे प्रयत्न करण्यात आला.यावरुन बोराडी रेंजला सत्ताधारी व किसान सभेचे कार्यकर्ते यांची खडाजंगी उडाली होती.


शिरपूर चोपडा रोडवरील तरडी जवळली अपघाती जागेवर नामदार पालक मंत्री गिरीश भाऊ महाजन यांचा जंगी सत्काराला शिरपूर ला येत असताना किसान सभेने रस्ता रोको आंदोलन करुन 

२२लाख रुपयांच्या पुल मंजुर करुन घेतला सदर पुलाचा कामाचे उद्घाटन देखिल किसान सभेचे जेष्ठ नेते अर्जुन कोळी यांचे हस्ते करण्यात आले.चांगल्या दर्जाचे काम करुन घेतले हजोरो नागरिकांचा अपघात स्थळी जीव वाचविले.


९/१०/२०२५ रोजी सावेर जवळील अपघाती रस्त्यावर राजस्थानी धाब्याजवळ किसान सभा,व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा नेतृत्वात रस्ता रोको आंदोलन करून एन.एच.आय,चे इंजिनिअर व संबंधित ठेकेदारा यांना आंदोलन ठिकाणी बोलवुन चांगले काम करण्याची हमी घेतली त्या ठिकाणी आंदोलन स्थळी सध्या काम सुरू आहे.


आमादार साहेबांनी जरूर तेथे भेट द्यावी.

मी काय व माझी किसान सभा, कम्युनिस्ट पक्ष माझ्यासह माझे सर्व हजोरो कार्यकर्ते

 असे आंदोलने लोकप्रियते साठी करतो का?  आम्ही साधे वाढदिवसाचे कौतुक देखिल करीत नाही.मी चळवळीचा मातीतून तयार झालेला साधा सच्चा कार्यकर्ता आहे.


आम्ही प्रसिद्धीसाठी,व लोकप्रियते साठी आंदोलन करीत नाही. तर सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी आणि आदिवासी बांधव यांच्या हितासाठी आंदोलन करत असतो.


आमदार साहेब आपण तालुक्यांचे लोकप्रतिनिधी आहात . म्हणून आम्ही शेतकऱ्यांचा तुम्ही आमच्या प्रश्नांबाबत लक्ष देत नाहीत.असे आम्हास बोलण्याचा अधिकार नाही का? आपण जर शेतकऱ्यांची कैवारी आहात तर मग खालील प्रश्न आजपर्यंत अनुत्तरीत का आहेत ?


 माझे आज देखिल शेतकरी प्रतिनिधी म्हणून आपणा समोर काही प्रश्न आहेत.


साखर कारखाना केव्हा सुरू करणार?


सुतगिरणीत शेतकऱ्यांचा कापुस कधी खरेदी करणार?


माझा सुजलाम सुफलाम तालुक्यातील दुध उत्पादक संस्था केव्हा सुरू होणार?


१३०००/वनजमिन धारकांना ७/१२केव्हा मिळणार?


सर्व तालुक्यातील जि.प.शाळा डीजिटल केव्हा होणार?


शिरपूर तालुक्यातील रेशन व्यवस्था केव्हा भ्रष्टाचार मुक्त होणार?


पंचायत समितीतील भष्टाचार केव्हा कमी होणार?


शिरपूर तालुक्यातील खेड्यातील रस्ते शिरपुर शहारातील रस्त्याप्रमाणे केव्हा होतील?


फळ पिक विमा शेतकर्यांना केव्हा मिळणार?


कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांना केव्हा आपले उत्पादीत माला साठी हक्काची जागा.केव्हा मिळणार?


आणि आपण सत्तेत आहेत तर सांगा शेतकऱ्याचा ७/१२ केव्हा कोरा करणार ?


आदिवासी मुलांवरील दाखल गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले? 


करवंद फॅक्टरी च्या दुर्गंधी पासून शिरपूर शहरातील नागरिकांना मुक्तता मिळेल का ?


बारा वर्षापासून टोलच्या नावाने होणारी नागरिकांची आर्थिक लूट कधी थांबणार ?


या तालुक्यातील नेत्यांकडे खाजगी प्रकल्प उभारण्यासाठी वेळ आहे पण भूमिपुत्रांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी वेळ नाही.


या वरिल प्रश्नांची उत्तरे किसान सभे सहित तालुक्यातील शेतकऱ्यांना हवी आहेत.


एकदा या सर्व प्रश्नांची उत्तरे जाहीरपणे द्या आणि सिद्ध करा की तुम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आहात.


आम्ही या सर्व विषयावर सतत लढत असतो.कोणत्याहि प्रसिद्ध साठी व, लोकप्रियतेसाठी कधीच नाही.त्यांची हौस देखील आम्हाला मुळीच नाही. आमच्यासाठी वरील प्रश्न सुटणे हाच खरा विकास असेल.


आंदोलनामुळे व आमच्या बोलण्यामुळे कमीतकमी आपण आपली भुमिका तालुक्यातील शेतकऱ्यांना कळली धन्यवाद आमदार साहेब आपले.माझ्याबाबती प्रतिक्रिया दिल्याबद्दल.


शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणं गुन्हा नाही. जो आवाज शेतकऱ्यांच्या जगण्याचा आहे, तो ‘लोकप्रियतेचा डाव’ नव्हे, तर संघर्षाचा नाद आहे. “शिरपूरचा शेतकरी जागा आहे, आणि किसान सभा त्याचा आवाज बनली आहे!” आणि भविष्यात याहीपेक्षा प्रखरपणे रस्त्यावर उतरून सामान्यांच्या आवाज बुलंद करण्याचे काम या तालुक्यातील जागरूक नागरिक आणि किसान सभा यापुढेही करत राहील. 


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने