सीजेआई भूषण गवई व पर्यावरणवादी सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ बिरसा आर्मीचे निवेदन
प्रतिनिधी, शिरपूर
देशाच्या न्याय व्यवस्थेतील सर्वोच्च पद असलेले सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्या. भूषण गवई यांच्यावर भर कोर्टात सुनावणी दरम्यान झालेला बूटहल्ला व पर्यावरणवादी, लोकशाही नेते सोनम वांगचूक यांना रासुका अंतर्गत झालेल्या अटके विरोधात बिरसा आर्मी संघटनेने प्रांत अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे मा. राष्ट्रपती, मा. सर्वोच्च न्यायालय व केंद्रीय गृह मंत्रालयाकडे न्यायाची मागणी केली आहे.
संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशाचे प्रथम नागरिक असलेल्या महामहीम राष्ट्रपती यांना शपथविधी देणारे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा. भूषण गवई यांच्यावर झालेला बूटहल्ला व पर्यावरणवादी, शिक्षणतज्ञ लोकशाहीवादी नेते सोनम वांगचूक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्ग झालेल्या अटकेचा जाहिर निषेध केला असून सरन्यायाधीश यांच्यावर बूटहल्ला करणाऱ्या मानसीक विकृतीच्या वकीलावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून सदर प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून कठोर शिक्षेची मागणी केली आहे. तर लोकशाही मार्गाने अहींसक पद्धतीने लदाख प्रांतासाठी 6 व्या अनुसूचीची मागणी करणारे, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या विविध नामांकीत पुरस्काराने सन्मानीत असलेले, आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधीत्व करणारे सोनम वांगचूक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली झालेली अटक ही बेकायदेशीर असून त्यांच्यावरील रासुका रद्द करून त्यांची तात्काळ सुटका करण्याची मागणी प्रांत अधिकारी यांना, दिलेल्या निवेदनातून मा. राष्ट्रपती, मा. सर्वोच्च न्यायालय व केंद्रीय गृह मंत्रालयाकडे करण्यात आली. यावेळी मनोज पावरा, विजय पावरा उपस्थित होते.
#BirsaArmy #CJI_BhushanGavai #SonamWangchuk #EnvironmentalJustice #ClimateAction #SupportCJI #SaveEnvironment #JusticeForNature #BirsaArmyMovement #VoiceForEnvironment #IndianJudiciary #EcoWarrior #EnvironmentalAwareness #ConstitutionalJustice #YouthForChange
