झाडांचे महत्त्व वृक्ष,वनांचे महत्व संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" ! या अभंगातून सांगितलेले आहे.
झाडे लावा देश वाचवा , झाडे लावा पर्यावरण वाचवा, झाडे लावा झाडे जगवा.अशा अनेक घोषणा आपल्या कानी पडत असतात.
आपल्या आयुष्यात झाडांचं खूप महत्त्वाचे स्थान आहे. झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात व कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतात माणसाला जगण्यासाठी प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजनची गरज आहे. हा प्राणवायू आपल्या पृथ्वीवर कमी होत आहे.व कार्बन हायड्रॉक्साइड हा वायू जास्त आहे. तो कार्बन हायड्रॉक्साइड वायू शोषून घेतो व ऑक्सिजन सोडतो, परंतु ही क्रिया माणसांच्या त्यांच्या श्वसनक्रियेच्चा विरुद्ध आहे, माणूस ऑक्सिजन घेतो,व कार्बन डाय-ऑक्साइड वायू सोडतो. कार्बन वायू वातावरणात जास्त आहे परंतु त्यामानाने वातावरणात प्रचंड संख्येने असलेल्या झाडांनी कार्बन हायड्रॉक्साइड हा वायू शोषून घेत असतो.कार्बन हायड्रॉक्साइड वायू शोषून घेण्याची व्यवस्था नष्ट झाल्यामुळे कार्बन हायड्रॉक्साइड वायूचे प्रमाण वाढत आहे,त्यामुळे जागतिक तापमान वाढीचे संकट आपल्यासमोर येत आहे.
वृक्षांचे कार्य
प्राणवायू (ऑक्सिजन उत्पादन करणे) , हवा प्रदूषण थांबवणे जमिनीची धूप थांबवणे,जमिनीमध्ये पाण्याची पातळी उंचावणे / टिकवणे, पशुपक्षी यांचे स्थान.
भारतीय संस्कृतीमध्ये झाडांचे संरक्षण करण्याचा विचार झालेला आहे. देवराईच्या माध्यमातून पूर्वी झाडांचे संरक्षण केले जात होते,देवराई म्हणजे देवांसाठी राखून ठेवलेले जंगल होय. अशी भावना त्या भागात राहणाऱ्या लोकांची झाली होती म्हणजेच देवाप्रती भावनेमुळे या भागातील एकही झाड तोडले जात नसेल त्यामुळे देवराईतील झाडे आजही सुरक्षित आहेत.
तासभर ऑक्सिजन देणाऱ्या डॉक्टरला आपण देव मानतो,पण आयुष्यभर फुकट ऑक्सीजन देणाऱ्या झाडांची आपण कधीही कदर करत नाही. आपण 'झाडे लावा जीवन वाचवा'आज अनेक ठिकाणी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम होत असतो. अशा कार्यक्रम आपल्या परिसरात पाहतो परंतु वृक्ष लागवड झाल्यानंतर झाडांना पाणी कोण देत असते ? या झाडांचे संगोपन कोण करत असते ? त्या झाडांना नंतर कोण लक्ष देत असते ? अशा अनेक प्रश्न आहेत आणि हे खरे आहे परंतु यात आपले पर्यावरण आपला जीव वाचवण्याचा वाचवायचा असेल तर वृक्ष वाढवणे गरजेचे आहे. फक्त वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती न घेता ते झाड प्रत्येक नागरिकांनी दत्तक घेतले पाहिजे जसे एखादा व्यक्ती मुलाला दत्तक घेतो त्या मुलांचे जसे संगोपन करत असतो तसे त्या माणसाने देखील मुलांप्रमाणे एक झाड दत्तक घेऊन झाडांचे संरक्षण केले पाहिजे.
मला असे वाटते की आपल्या आपल्याला झाडे जगवण्यासाठी एक मोहीम हाती घेतली पाहिजे एखाद्या माणसाचा वाढदिवस आहे आपण त्याला काही भेटवस्तू देत असतो भेट वस्तूच्या जागेवर आपण त्या वस्तू ऐवजी एक झाडाचे रोप भेट द्यावे . एक तरी झाड लावले पाहिजे.
शाळेत कुठलाही कार्यक्रम कार्यक्रमात आपण जे प्रमुख पाहुणे बोलावतो त्या प्रमुख पाहुण्यांचा आपण पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार करत असतो , परंतु त्या ऐवजी या प्रमुख पाहुण्यांना आपण एक झाडाचे रोप दिले पाहिजे.
प्रत्येक व्यक्तीने आपल्या वाढदिवसानिमित्त एक तरी झाड लावावे त्याचबरोबर त्या झाडाचे संगोपन केले पाहिजे.परिसरात झाडे असणे म्हणजे सुंदरतेचे प्रतीक असते.
आज आपण एक संकल्प करू की आंबे,फणस, जांभळा, अशा विविध फळांच्या बिया कचर्यात न टाकता त्यांना स्वच्छ धुऊन ठेवले पाहिजे व आपण पावसाळ्यात जेव्हा बाहेर परिसरात फिरायला जात असतो तेव्हा त्या बीया आपण परिसरात लावल्या पाहिजे. त्या पैकी किमान एक तरी बी रुजली तर अनेक झाडे निर्माण होतील.वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज आहे व त्या वृक्षाचे संवर्धन करणे ही तितकेच महत्त्वाचे आहे.
आजच्या काळात सुशोभीकरणाच्या नावाखाली अनेक झाडांची कत्तल केली जाते. " वृक्षांची कत्तल करून आपले आयुष्य कमी करण्यापेक्षा वृक्ष लावून आपले आयुष्य वाढवा " वृक्षतोड थांबवली पाहिजे.
पूर्वी वृक्षतोड थांबवण्यासाठी जसे चिपको आंदोलन झाले. एप्रिल 1973 मध्ये अकलनंदा खोऱ्यातील मंडळगावात चिपको आंदोलनाची सुरुवात झाली, या मध्ये वृक्षतोडीचा विरोध करण्यासाठी स्त्रीयांनी सहभाग घेतला व वृक्षतोड होणाऱ्या वृक्षाला कवटावुन ठेवले या आंदोलनामुळे शेकडो झाडांची जंगले वाचली, असेच आंदोलनाची गरज वाटू लागली आहे.
वृक्षतोड थांबवण्याची गरज आहे. वृक्षतोडीमुळे जागतिक तापमानात वाढत आहे. या जागतिक तापमान वाढ झाल्यामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण वाढत आहे, परंतु पर्जन्यवृष्टी मात्र त्या प्रमाणात होत नाही.म्हणून जमिनीवर पाण्याचे साठे आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वाढत नाही.या समस्या आपल्याला पाहावयास मिळतात त्यासाठी या समस्या सोडवण्यासाठी वृक्ष तोड थांबवण्याची गरज आहे.वृक्षतोड थांबवणे ही काळाची गरज आहे .
वृक्ष जर वाचले वाचवले नाही तर मानवी जीवन कोणही वाचवणार नाही.
वृक्षतोडीमुळे जमिनीची धूप होत असते जमिनीची धूप झाल्यानंतर शेती करण्यासाठी पोषणयुक्त माती(जमीन)राहत नाही,म्हणून शेती करणे योग्य जमीन उपलब्ध होत नाही. जंगलतोड थांबून मानवाने वृक्षाचे महत्त्व कळाले पाहिजे.
वृक्षतोडीमुळे अनेक जंगले नष्ट झाले आहेत जंगले नष्ट झाल्यामुळे तेथील प्राणीदेखील नामशेष होण्याच्या मार्गावर आहे म्हणून सजीव सृष्टी जिवंत ठेवायचे असेल तर वृक्षतोड थांबवली पाहिजे.
वृक्षतोडीमुळे जंगलातील वनसंपदा व तेथील अन्य सजीव सृष्टी नष्ट झाली आहे. जंगलातील औषध वनस्पती देखील नष्ट झाली आहे वृक्षावर प्रेम करणारा माणूस क्वचितच सापडतो.
वृक्ष वाचले पाहिजे वृक्ष वाचले तरच आपले जीवन वाचेल चला तर एक संकल्प करू एक तरी झाड लावू व कोणी झाड तोडत असेल तर त्याला थांबवू .
झाडे लावा जीवन वाचवा, देश वाचवा ..
पुरुषोत्तम चिंतामण धनगर
मु.पो.सोनगीर ता.जि.धुळे
मो.नं.9404403291
Tags
news