*शिरपूर तालुक्यात व शहरात जनसंघर्ष यात्रेचा रणसंग्राम..* २१ गावांमध्ये फिरून जनतेच्या समस्या जाणून घेतल्या.. शिरपूर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या शिरपूर फर्स्टच्या वतीने शिरपूर तालुक्यात भव्य जनसंघर्ष यात्रा आयोजित करण्यात आली होती. दिनांक २३ मे ते २८ मे दरम्यान ही यात्रा तालुक्यातील तब्बल २१ गावांमध्ये पोहोचली. यात्रेचा समारोप २८ मे रोजी सायंकाळी शिरपूर शहरातील बौद्धवाडा चौक येथे करण्यात आला. या यात्रेच्या माध्यमातून शिरपूर फर्स्टने गेल्या तीन वर्षांपासून केलेल्या विविध आंदोलनांची, निवेदनांची आणि जनहिताच्या लढ्यांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात आली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उभारलेले आंदोलन, रस्त्यासाठी केलेले आंदोलन, शाळांसाठी केलेले प्रयत्न तसेच विविध सामाजिक प्रश्नांवर केलेल्या निवेदनांची माहिती गावागावात नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली. यात्रेदरम्यान प्रत्येक गावात स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. रेशन वितरणातील अडचणी, लाडकी बहीण योजनेतील त्रुटी, ज्येष्ठ नागरिक योजनांमधील समस्या याबाबत नागरिकांशी चर्चा करण्यात आली. अनेक गावांमध्ये आजही रस्ते व गटारांची समस्या गंभीर असल्याचे नागरिकांनी सांगितले. या प्रश्नांवर येत्या काळात प्रशासनाकडे पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्याचा निर्धार शिरपूर फर्स्टच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. दरम्यान, यात्रेदरम्यानच कापूस लागवडीसाठी लागणारा वाय-१ (Y1) बियाणा बाजारात दुप्पट किमतीने विकला जात असल्याचा मुद्दा समोर आला. शेतकऱ्यांची होत असलेली आर्थिक लूट लक्षात घेता शिरपूर फर्स्टच्या वतीने तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तसेच याप्रकरणी तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. तसेच लाडकी बहीण योजनेतील अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्याची तक्रार अनेक गावांमधून समोर आली. या लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी येत्या काळात मोठा लढा उभारण्यात येईल, असा इशारा देखील शिरपूर फर्स्टच्या वतीने देण्यात आला. गावातील स्थानिक प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, रेशन व्यवस्था, विविध योजनांमधील त्रुटी यासंदर्भात निवेदन आणि आंदोलनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी शिरपूर फर्स्ट भविष्यातही संघर्ष करत राहील, असा निर्धार यात्रेदरम्यान व्यक्त करण्यात आला. या जनसंघर्ष यात्रेचा शुभारंभ २३ मे रोजी खर्दे येथील दत्त मंदिरापासून करण्यात आला होता. तर २८ मे रोजी शिरपूर शहरातील बौद्धवाडा येथे यात्रेचा समारोप करण्यात आला. यात्रेदरम्यान गावागावात नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवकांनी मोठ्या प्रमाणावर यात्रेत सहभाग घेत शिरपूर फर्स्टच्या कार्याला पाठिंबा दर्शविला. जनसंघर्ष यात्रेचे संयोजक रवींद्र भील, सहसंयोजक चैतन्य जमादार व प्रणव भामरे, नियंत्रक रामेश्वर पावरा यांनी आभार व्यक्त केला आहे.

**शिरपूर तालुक्यात व शहरात जनसंघर्ष यात्रेचा रणसंग्राम..*

२१ गावांमध्ये फिरून जनतेच्या समस्या जाणून घेतल्या..

शिरपूर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या शिरपूर फर्स्टच्या वतीने शिरपूर तालुक्यात भव्य जनसंघर्ष यात्रा आयोजित करण्यात आली होती. दिनांक २३ मे ते २८ मे दरम्यान ही यात्रा तालुक्यातील तब्बल २१ गावांमध्ये पोहोचली. यात्रेचा समारोप २८ मे रोजी सायंकाळी शिरपूर शहरातील बौद्धवाडा चौक येथे करण्यात आला.

या यात्रेच्या माध्यमातून शिरपूर फर्स्टने गेल्या तीन वर्षांपासून केलेल्या विविध आंदोलनांची, निवेदनांची आणि जनहिताच्या लढ्यांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात आली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उभारलेले आंदोलन, रस्त्यासाठी केलेले आंदोलन, शाळांसाठी केलेले प्रयत्न तसेच विविध सामाजिक प्रश्नांवर केलेल्या निवेदनांची माहिती गावागावात नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली.

यात्रेदरम्यान प्रत्येक गावात स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. रेशन वितरणातील अडचणी, लाडकी बहीण योजनेतील त्रुटी, ज्येष्ठ नागरिक योजनांमधील समस्या याबाबत नागरिकांशी चर्चा करण्यात आली. अनेक गावांमध्ये आजही रस्ते व गटारांची समस्या गंभीर असल्याचे नागरिकांनी सांगितले. या प्रश्नांवर येत्या काळात प्रशासनाकडे पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्याचा निर्धार शिरपूर फर्स्टच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, यात्रेदरम्यानच कापूस लागवडीसाठी लागणारा वाय-१ (Y1) बियाणा बाजारात दुप्पट किमतीने विकला जात असल्याचा मुद्दा समोर आला. शेतकऱ्यांची होत असलेली आर्थिक लूट लक्षात घेता शिरपूर फर्स्टच्या वतीने तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तसेच याप्रकरणी तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.

तसेच लाडकी बहीण योजनेतील अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्याची तक्रार अनेक गावांमधून समोर आली. या लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी येत्या काळात मोठा लढा उभारण्यात येईल, असा इशारा देखील शिरपूर फर्स्टच्या वतीने देण्यात आला.

गावातील स्थानिक प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, रेशन व्यवस्था, विविध योजनांमधील त्रुटी यासंदर्भात निवेदन आणि आंदोलनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी शिरपूर फर्स्ट भविष्यातही संघर्ष करत राहील, असा निर्धार यात्रेदरम्यान व्यक्त करण्यात आला.

या जनसंघर्ष यात्रेचा शुभारंभ २३ मे रोजी खर्दे येथील दत्त मंदिरापासून करण्यात आला होता. तर २८ मे रोजी शिरपूर शहरातील बौद्धवाडा येथे यात्रेचा समारोप करण्यात आला.

यात्रेदरम्यान गावागावात नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवकांनी मोठ्या प्रमाणावर यात्रेत सहभाग घेत शिरपूर फर्स्टच्या कार्याला पाठिंबा दर्शविला.

जनसंघर्ष यात्रेचे संयोजक रवींद्र भील, सहसंयोजक चैतन्य जमादार व प्रणव भामरे, नियंत्रक रामेश्वर पावरा यांनी आभार व्यक्त केला आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने