महेश पाटील यांना शिवविजय फाउंडेशन चा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर गौरव पुरस्कार जाहीर.
भगूर चे सुपुत्र स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त शिवविजय फाउंडेशन, भगूर यांच्यावतीने दिला जाणारा “स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर गौरव पुरस्कार २०२६” जाहीर झाला आहे. शिवसेना उपनेते विजय करंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली घोषित झालेल्या या पुरस्कारांचे वितरण २९ मे रोजी सायंकाळी सहा वाजता भगूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात होणार आहे.
यंदाचा मनाचा सामाजिक क्षेत्रातील “स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर गौरव पुरस्कार २०२६” महेश मोतीलाल पाटील, यांना सामाजिक, शैक्षणिक, व पर्यावरण या कार्यासाठी प्रदान करण्यात येणार आहे. तसे पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्र संस्थेचे प्रमोद घुमरे यांनी दिले आहे. इतर पुरस्कारांमध्ये जेष्ठ नेते एकनाथ शेटे (जीवन गौरव पुरस्कार), महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन चे उपकार्याध्यक्ष नारायणशेठ वाजे (सहकार), भाजपचे प्रवक्ते लक्ष्मण सावजी (राजकीय), नाशिक मनपाचे माजी नगरसेवक आणि सर्जन डॉ. राजेंद्र जाधव (आरोग्य), जेष्ठ उद्योजक उत्तमराव शिंदे (उद्योग), भगूररत्न हभप गणेश महाराज करंजकर ( अध्यात्म), मुंबई येथील जेष्ठ साहित्यिक जयेश मेस्त्री (साहित्य), नाशिक तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष जेष्ठ पत्रकार सुधाकर गोडसे (पत्रकारिता), प्रयोगशील युवा शेतकरी गणेश निसाळ (कृषी), आंतरराष्ट्रीय क्रीडापटू संग्राम गायकवाड ( क्रीडा), महिलांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी कार्यरत चित्रा भवरे ( महिला सबलीकरण), एरंडोलच्या पुस्तकांचा बगीचा या अभिनव उपक्रमाचे शिल्पकार आणि सध्या छत्रपती संभाजी नगर महापालिकेतील उपायुक्त विकास नवाळे (शासकीय सेवा), उपक्रमशील अध्यापक आणि व्याख्याते प्रा. हेमंत टिळे ( शिक्षण). प्रसिद्ध नृत्यांगना शिवानी जोशी (कला/संस्कृती). यांचा समावेश आहे. तसेच संस्थात्मक पातळीवर “नाशिक रोड शिवजन्मोत्सव सोहळा समिती” ला संस्था पातळीवर सन्मानित केले जाणार आहे.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या या व्यक्तींच्या कार्याची दखल घेत शिवविजय फाउंडेशनचे सावरकरांच्या विचारांचा वारसा जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. या सोहळयाला सावरकर प्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक शिवविजय फाउंडेशनने केले आहे.
