पेट्रोल-डिझेलच्या दरात सुरू असलेल्या वाढीतून
तात्काळ दिलासा मिळण्याची शक्यता कमी: रिपोर्ट
निर्भीड विचार विशेष -
रिपोर्ट्सनुसार, मध्य पूर्वतील तणाव आणे वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तात्काळ दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर सध्याची परिस्थिती दीर्घकाळ टिकली तर इंधनाच्या
किमती आणखी वादू शकतात, कारण तेल कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेलवर अजूनही प्रति लिटर ८-९0 रुपयांचा तोटा होत आहे,
सध्या ची युद्ध युद्धजन्य परिस्थिती, आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पेट्रोल डिझेलच्या बॅरल दरात होणारी वाढ यामुळे जरी ही परिस्थिती असली तरी, यापूर्वी तेल कंपन्यांना करोडो रुपयांच्या फायदा देखील झाला आहे. त्यामुळे सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून लावण्यात येणारे टॅक्स मध्ये कमी करून, दर नियंत्रण करण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत, मात्र इंधन कंपन्या नुकसान सहन करण्यास तयार नाहीत तर दुसरीकडे केंद्र आणि राज्य सरकार देखील आपला कराचा कोणताही बोजा कमी करण्यास तयार नाही अशी परिस्थिती असल्याने ,
सामान्यांचे कंबरडे मात्र पूर्णपणे महागाईच्या ओझ्याखाली मोडले जाणार असून , पेट्रोल डिझेलच्या दरवाढीच्या परिणाम हा सर्वच घटकांवर होणार असून, येत्या काळात महागाई भस्मासुराचे रूप धारण करण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.
सरकारकडून वारंवार पेट्रोल डिझेलच्या मुबलक साठा असल्याचा दावा जरी करण्यात येत असला तरी राज्यातील विविध गावात पेट्रोल पंपांवर होणारी गर्दी, अपूर्ण पुरवठा, आणि लोकांचे होणारे हाल यावरून सरकारच्या दावा सध्या तरी फोल ठरत आहे.
त्यामुळे अर्थतज्ज्ञांच्या मते यावर वेळेत नियोजन केले गेले नाही तर परिस्थिती नियंत्रण बाहेर जाईल आणि पेट्रोल डिझेलच्या दरात येत्या काळात टप्प्या टप्प्याने 15 ते 20 रुपये वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
