तेजस टेनिस अकॅडमीचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न

 


युवराजसिंग राजपूत, नाशिक 



तेजस टेनिस अकॅडमीचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न

नाशिक: पेठे नगर येथील प्रसिद्ध तेजस टेनिस अकॅडमी तर्फे आयोजित NDTA TPL TTA 250 टेनिस स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. या सोहळ्यात विविध ४  वयोगटातील गुणवंत खेळाडूंचा गौरव करण्यात आला.या कार्यक्रमासाठी मुख्य पाहुणे म्हणून मा.बॉबी काळे सर व प्रशांत सोनवणे उपस्थित होते. अकॅडमीचे संचालक आणि प्रशिक्षक यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना खेळातील शिस्त आणि सातत्यपूर्ण सरावाचे महत्त्व अधोरेखित केले.स्पर्धेचे ठळक निकाल:१४ वर्षांखालील गट: सार्थ सोनवणे याने अंतिम फेरीत कबीर मोठे याचा पराभव करून विजेतेपद पटकावले.१२ वर्षांखालील गट: अटीतटीच्या सामन्यात विश्वम भड याने बाजी मारली.खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते चषक, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे पालक आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश मोठे यांनी केले, तर आभार प्रदर्शन योगेश पाटील यांनी मानले. दर्जेदार प्रशिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या या अकॅडमीने भविष्यातही अशा स्पर्धांचे आयोजन करून नाशिकमधून राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडवण्याचा मानस तेजस टेनिस अकॅडमी चे संचालक युवराज गावित यांनी व्यक्त केला आहे.स्थळ: तेजस टेनिस अकॅडमी, पेठे नगर, नाशिक.संपर्क: 088-885-74456 mothe103@gnail.com

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने