शिरपूर शहर पोलिसांची दमदार कामगिरी!
आश्रम शाळेचे चोरीस गेलेले पिकअप अवघ्या 6 दिवसांत जप्त; दोन चोरटे जेरबंद
शिरपूर | प्रतिनिधी
जळोद येथील आश्रम शाळेच्या आवारातून चोरीस गेलेले पिकअप वाहन अवघ्या काही दिवसांत शोधून काढत शिरपूर शहर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. तसेच चोरीस गेलेले सुमारे 1 लाख 40 हजार रुपये किमतीचे पिकअप (छोटा हत्ती) वाहन हस्तगत करण्यात आले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 24 मे 2026 रोजी जळोद (ता. शिरपूर) येथील आश्रम शाळेच्या आवारातून शाळेचे धान्य वाहतुकीसाठी वापरले जाणारे MH-15/CK-4882 क्रमांकाचे पिकअप वाहन अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते. याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांना गोपनीय माहिती मिळाली की, जुने भामपूर येथील दोन युवकांनी सदर वाहन चोरी केली आहे. त्यानुसार पोलिसांच्या शोध पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेतला.
तपासादरम्यान संगम गंगाराम सोनवणे (भिल, वय 22, रा. चित्तेगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव, सध्या मुक्काम जुने भामपूर) आणि अनिल खेमराज भिल (भवरे, वय 22, रा. जुने भामपूर, ता. शिरपूर) यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत त्यांनी वाहन चोरीची कबुली दिली.
आरोपींनी विखरण गावाजवळील एका पत्र्याच्या शेडजवळ लपवून ठेवलेले चोरीचे पिकअप वाहन पोलिसांना दाखवून दिले. त्यानुसार वाहन जप्त करण्यात आले असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे तसेच शिरपूर शहर पोलिसांच्या शोध पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
#ShirpurPolice #VehicleTheft #PickupRecovered #PoliceAction #DhulePolice #ShirpurNews #CrimeNews #BreakingNews #MaharashtraPolice #NirbhidVichar #Jalod #DhuleNews #PoliceSuccess #CrimeUpdate #LatestNews
@DGPMaharashtra
@SPDhule
@MahaPolice
@CollectorDhule
@NirbhidVichar
#शिरपूर #धुळे #पोलीसकारवाई #वाहनचोरी #ब्रेकिंगन्यूज #निर्भीडविचार #महाराष्ट्रन्यूज #क्राईमन्यूज #शिरपूरपोलीस #धुळेपोलीस
