** जयदीप नॉलेज कॅम्प देगाव** यांच्या संकल्पनेतून 40 पेक्षा अधिक परिवारातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांचा आई-वडिलांचा सन्मानपत्र देऊन सत्कार
दोंडाईचा अख्तर शाह
शिंदखेडा तालुक्यातील देगाव येथील जयदीप नॉलेज कॅम्प आधारस्तंभ बापूसाहेब रजेसिंग गिरासे सरपंच दलवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे संस्थापक दीपक दादा गिरासे यांच्या संकल्पनेतून शिंदखेडा तालुक्यातील स्पर्धा परीक्षा लोकसेवा आयोग यूपीएससी व एमपीएससी परीक्षेतून प्राविण्य मिळवलेले काही गुणवंत विद्यार्थी PSI, IDES तसेच वर्ग एक अधिकारी, पोलीस भरती, आर्मी भरती, सीआरपीएफ, पॅरा कमांडो, सारख्या विविध ठिकाणी निवड झालेले शिंदखेडा तालुक्यातील युवक तसेच सायन्स कॉलेजचे बारावीत अधिक टक्के मिळून पास झालेले गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा भव्य दिव्य सत्कार समारंभ संपन्न झाला तसेच संस्थेचे पुढील भविष्य आढावा बैठक देखील काल संध्याकाळी पार पडली या कार्यक्रमापासून भविष्यात युवकांना व पालकांना प्रेरणा मिळतील जयदीप नॉलेज कॅम्पचे संस्थापक दीपक गिरासे प्रत्येक वेळेस जनहितार्थ कार्यात अग्रेसर असतात सर्व सामाजिक बांधिलकी व शैक्षणिक दूरदृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून आपला परिसरात नवीन चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न हा प्रामाणिक असतो याचे उत्तम उदाहरण हा नुकताच झालेला कार्यक्रम वरून लक्षात येते.
मा. दीपक दादा व त्यांच्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमात माध्यमातून असंख्य असे कार्यक्रम समाज उपयोगी होत आले आहेत हे परिसराने देखील पाहिले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांचा सत्कार हा नावीन्यपूर्ण कार्यक्रम हा पहिल्यांदाच या परिसरात होत असल्याने सर्वीकडे या कार्यक्रमाचे कौतुक होत आहे
या कार्यक्रमासाठी परिसरातील प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संस्थापक दीपक गिरासे, उपाध्यक्ष प्रतिष्ठा गिरासे, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विरेंद्रसिंग गिरासे मा. जिल्हा परिषद सदस्य चिमठाणे यांना देण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून रणजित गिरासे मा. सभापती पंचायत समिती शिंदखेडा, रामसिंग गिरासे रिटायर सुभेदार इंडियन आर्मी, योगेश पाटील पीएसआय, सुवर्णसिंग गिरासे सर सरपंच वाडी, दगेसिंग गिरासे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती दोंडाईचा, रतिलाल पाटील संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती दोंडाईचा, मोघेसिंग गिरासे प्राध्यापक गुरुकुल पुणे, महेंद्रसिंग गिरासे संपादक स्वराज्य चैनल, डॉ.कोमलसिंग गिरासे, दगा माळी कढरे, कार्यक्रमाची प्रास्ताविक व सूत्रसंचालन एड. रावसाहेब रावल सर नगरदेवळा व अमोल साळवे सर, प्रिन्सिपल जयदीप कॉलेज, कैलास राजपूत पत्रकार, आक्तर शहा पत्रकार, अण्णा कोळी पत्रकार, प्रदीप गिरासे पत्रकार, राजेंद्र वाणी चेअरमन विकास सोसायटी शेवाळे, महेंद्र माळी ग्राम सदस्य लिलेश देसले ग्राम सदस्य दलवाडे राहुल कोळी , वीरेंद्र गिरासे देगांव, प्रकाश गिरासे सा. कार्य.सतारे, पिंटू पाटील मा. सरपंच देगाव, भिमसिंग गिरासे, पंकज गिरासे, देगांव, व मोठ्या संख्येने पालक वर्ग व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक मंडळी, देगाव गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यासाठी सर्व जयदीप नॉलेज स्टाफ ने अथक मेहनत घेतली होती. व कार्यक्रमात शेवटी राष्ट्रगीत झाले.
